कोल्हापुरात एकाच कुटुंबात डेंग्यूचे पाच संशयित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 01:03 AM2018-10-29T01:03:03+5:302018-10-29T01:03:06+5:30

कोल्हापूर : मंगळवार पेठ, मंगेशकरनगर येथील एकाच कुटुंबातील पाचजणांना डेंग्यूची लागण झाली आहे. याकडे महापालिकेच्या प्रशासनासह स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष ...

Five suspected dengue cases in one family in Kolhapur | कोल्हापुरात एकाच कुटुंबात डेंग्यूचे पाच संशयित

कोल्हापुरात एकाच कुटुंबात डेंग्यूचे पाच संशयित

Next

कोल्हापूर : मंगळवार पेठ, मंगेशकरनगर येथील एकाच कुटुंबातील पाचजणांना डेंग्यूची लागण झाली आहे. याकडे महापालिकेच्या प्रशासनासह स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष होत असल्याच्या संतप्त भावना नागरिकांमधून उमटत आहेत. आतापर्यंत शहरात डेंग्यूने पाचहून अधिक जणांचा बळी गेला आहे.
महापालिका हद्दीत जूनमध्ये २९१ डेंग्यूचे रुग्ण आढळले. त्यानंतर दुसऱ्या महिन्यात त्यात आणखी वाढ होऊन ती संख्या ४६८ पर्यंत गेली. आॅगस्ट महिन्यात त्यात घट होऊन ती संशयित रुग्णांची संख्या ३१५, सप्टेंबरमध्ये १५८ झाली. ग्रामीण भागात सद्य:स्थितीत डेंग्यूचे ४७ रुग्ण अशी एकूण १३९ रुग्णसंख्या आहे.
मंगेशकरनगरात एकाच कुटुंबातील दोन महिला आणि तीन पुरुष अशा पाचजणांना डेंग्यूची लागण झाली आहे. चार-पाच दिवसांपासून हे रुग्ण तापाने आजारी आहेत. त्यांतील चार रुग्ण हे घरी, तर एक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
या परिसरात अनेक ठिकाणी अस्वच्छता आहे. गटारींची स्वच्छता नाही, औषधांची फवारणी झाली नाही अथवा महापालिकेच्या कोणत्याही वैद्यकीय पथकाने तसेच नगरसेवकाने या भागाला भेट दिली नसल्याचे नागरिकांनी रविवारी सांगितले.
शहरात प्रामुख्याने जून व जुलैमध्ये जवाहरनगर परिसरातील सासने-जमादार कॉलनी, सरनाईक वसाहतसह नेहरूनगर, कनाननगर या भागांत डेंग्यूची साथ होती. सध्या तेथील डेंग्यूची साथ कमी झाली आहे; पण डेंग्यूचा विळखा मंगेशकरनगर भागात अद्यापही असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
साडेदहा महिन्यांत डेंग्यूचे १३७८ रुग्ण
कोल्हापूर शहरात १ जानेवारी ते २७ आॅक्टोबर अखेर १३७८, तर ग्रामीण भागात ३९६ असे एकूण १७७४ डेंग्यूचे रुग्ण दाखल असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे.
डेंंग्यूचे बळी
तीन महिन्यांत कनाननगरातील शाळकरी मुलीचा, नेहरूनगर परिसरातील एकाचा तर दोन आठवड्यांपूर्वी पाटाकडील तालीम परिसरातील फुटबॉल खेळाडूचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला आहे.

Web Title: Five suspected dengue cases in one family in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.