रोकडेंच्या ‘व्हाईट आर्मी’कडून पाच हजार नागरिकांचा बचाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 08:30 PM2019-08-14T20:30:35+5:302019-08-14T20:32:07+5:30
महापुराला सुरुवात झाली त्या दिवसापासून व्हाईट आर्मीचे २00 जवान कार्यरत आहेत. सुरुवातीला बापट कॅम्प, सुतारवाडा, खानविलकर पेट्रोल पंप अशा शहरात अडकलेल्या नागरिकांना त्यांनी बाहेर काढले.
महापुराचे संकट कोल्हापूरवर आले त्या पहिल्या दिवसापासून अशोक रोकडे यांच्या व्हाईट आर्मी टीमने पुरात अडकलेल्या पाच हजारांहून अधिक नागरिकांना बाहेर काढणे, त्यांना स्थलांतरितांच्या ठिकाणी पोहोचविण्याचे कार्य केले आहे. आजदेखील ही टीम शिरोळमध्ये काम करत आहे.
महापुराला सुरुवात झाली त्या दिवसापासून व्हाईट आर्मीचे २00 जवान कार्यरत आहेत. सुरुवातीला बापट कॅम्प, सुतारवाडा, खानविलकर पेट्रोल पंप अशा शहरात अडकलेल्या नागरिकांना त्यांनी बाहेर काढले. त्यानंतर आंबेवाडी, चिखली, दोनवडे या भागातील पूरग्रस्तांना बोटीतून कोल्हापुरात आणले. याच बरोबरीने सांगली, वाळवा, इस्लामपूर या भागांतही त्यांनी बचावकार्य केले.