पाच हजारजणांनी घेतली कौशल्ये
By Admin | Published: March 4, 2016 01:04 AM2016-03-04T01:04:43+5:302016-03-04T01:06:38+5:30
शिवाजी विद्यापीठ : कौशल्य विकास मेळाव्याचा समारोप
कोल्हापूर : रोजगार, नोकरीसाठी उपयुक्त ठरणारी मुलाखतीचे तंत्र, आॅनलाइन अॅडव्हर्टायजिंग, एनर्जी टेक्नॉलॉजी अशी विविध कौशल्ये सुमारे पाच हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींनी जाणून घेतली. यासाठी त्यांनी शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित कौशल्य विकास मेळाव्याची संधी साधली. या मेळाव्याचा गुरुवारी समारोप झाला.
राज्य शासनाचा रोजगा
र व स्वयंरोजगार विभाग, विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र आणि युवक कल्याण कक्षातर्फे विद्यापीठातील लोककला केंद्रात हा कौशल्य मेळावा घेण्यात आला. यातून बुधवारी (दि. २) आणि गुरुवारी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील सुमारे पाच हजार विद्यार्र्थी-विद्यार्थिनींनी विविध कौशल्ये आत्मसात केली. मेळाव्याचा समारोप विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉ. वासंती रासम यांच्या उपस्थितीत झाला. त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्याचा कुलगुरूंचा मानस आहे. त्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावेळी डॉ. एस. एस. कोळेकर, सहायक संचालक सचिन जाधव उपस्थित होते. समन्वयक डॉ. ए. एम. गुरव यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान, या मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींकडून त्यांना हव्या असणाऱ्या कौशल्यांबाबतची माहिती संकलित केली आहे. तिचे विश्लेषण करून पुढील उपक्रमासाठी संबंधित माहिती विद्यापीठाला सादर करणार असल्याचे मेळाव्याचे समन्वयक डॉ. ए. एम. गुरव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)