उन्हाळा सुसह्य करणाऱ्या टरबूजची पाच टन आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:26 AM2021-04-09T04:26:12+5:302021-04-09T04:26:12+5:30

कोल्हापूर : उन्हाळ्यात उच्चकोटीच्या तपमानामुळे शरीरातील पाणी घामावाटे निघून जाते. त्यामुळे शरीराला पाण्याची नितांत गरज भासते. अशावेळी भरपूर पाणी ...

Five tons of summer watermelon | उन्हाळा सुसह्य करणाऱ्या टरबूजची पाच टन आवक

उन्हाळा सुसह्य करणाऱ्या टरबूजची पाच टन आवक

Next

कोल्हापूर : उन्हाळ्यात उच्चकोटीच्या तपमानामुळे शरीरातील पाणी घामावाटे निघून जाते. त्यामुळे शरीराला पाण्याची नितांत गरज भासते. अशावेळी भरपूर पाणी पिण्यासोबतच पाण्याचा अंश असलेल्या फळे खाणे आवश्यक असते. त्यामुळे कलिंगडासोबतच टरबुजाला मागणी वाढली आहे. त्यामुळे कोल्हापुरात माडग्याळ (ता. जत) येथून रोज पाच टनांची आवक होते.

उन्हाचा पारा जसजसा वाढू लागला तसे विविध प्रकारची सरबते, आइस्क्रीम आणि फळांचे ज्यूसला मागणी वाढते. मात्र, यात कृत्रिम शीतपेये शरीराची तात्पुरती तहान भागवतात. मात्र, त्यात कोणते रंग असतात अथवा कोणत्या रासायनिक पदार्थांपासून त्याची निर्मिती होते, याची जाणीव सर्वसामान्यांना नसते. त्यामुळे लिंबू सरबत, कोकम, विविध फळांचे ज्यूस आणि आइस्क्रीमला मागणी वाढते. मात्र, त्यातून शरीराला काही काळ थंडवा मिळतोही. मात्र, सातत्याने तहान लागत असते. अशा वेळी पाण्याबरोबरच कलिंगड, काकडी, टरबूज अशा ९५ टक्के पाणीवर्गीय फळांची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होती. त्यात टरबुजालाही मागणी वाढत आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील माडग्याळ (ता. जत) येथून कोल्हापुरात रोज पाच टन टरबुजाची कोल्हापुरातील कृषी उत्पन्न बाजारात आवक होऊ लागली आहे.

चौकट

यामुळे टरबुजाला मागणी

टरबुजात जीवनसत्त्व ‘अ’ आणि पोषक तत्त्वे असलेले खनिज पदार्थ असल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. यात लायकोपीन, कॅरोटिनाइड यात असल्याने हृदयाचे कार्य सुधारते. प्रतिकारशक्ती अधिक असल्याने त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत. मधुमेही असणाऱ्या लोकांना टरबूज फायदेशीर ठरते. कर्करुग्णाला कर्करोगाचे सेल्स वाढण्यापासून रोखण्याची शक्ती टरबुजात असते. तणाव, उच्च रक्तदाबसारख्या समस्यांमध्ये ते फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात टरबुजाला मागणी वाढते, असे जाणकार सांगतात.

कोट

टरबूज खाल्ल्यामुळे शरीरास जीवनसत्त्व अ व क मिळते. डोळ्यांसह कर्करोगाच्या पेशींंविरोधात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम ते करते. त्यामुळे उन्हाळ्यासह बारमाही टरबुजाचा वापर करावा. ते आरोग्यास चांगलेच आहे.

-डाॅ. गौरी माणगावकर, आहारतज्ज्ञ

Web Title: Five tons of summer watermelon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.