‘लोकमत’मध्ये उत्साही वातावरणात ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:29 AM2021-08-17T04:29:03+5:302021-08-17T04:29:03+5:30

कोल्हापूर : ‘लोकमत’च्या शिरोली एमआयडीसीतील मुद्रणस्थळाच्या प्रशस्त प्रांगणामध्ये स्वातंत्र्यदिनी उत्साही वातावरणामध्ये ध्वजारोहण करण्यात आले. ...

Flag hoisting in an enthusiastic atmosphere in ‘Lokmat’ | ‘लोकमत’मध्ये उत्साही वातावरणात ध्वजारोहण

‘लोकमत’मध्ये उत्साही वातावरणात ध्वजारोहण

Next

कोल्हापूर : ‘लोकमत’च्या शिरोली एमआयडीसीतील मुद्रणस्थळाच्या प्रशस्त प्रांगणामध्ये स्वातंत्र्यदिनी उत्साही वातावरणामध्ये ध्वजारोहण करण्यात आले. प्रतिवर्षी ‘लोकमत’मधील ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या हस्ते हे ध्वजारोहण करण्यात येते.

यंदा सांगली आणि कोल्हापूर वितरण विभागातील सहकारी शशिकांत मोरे आणि संग्राम पायमल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी, ‘लोकमत’चे संस्थापक, स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी संपादक वसंत भोसले, वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, मनुष्यबळ आणि प्रशासन विभागाचे व्यवस्थापक संतोष साखरे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.

१६०८२०२१ कोल लोकमत

‘लोकमत’च्या शिरोली एमआयडीसी येथील मुद्रणस्थळी स्वातंत्र्यदिनी उत्साही वातावरणामध्ये ध्वजारोहण करण्यात आले.

छाया - आदित्य वेल्हाळ

Web Title: Flag hoisting in an enthusiastic atmosphere in ‘Lokmat’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.