प्रजासत्ताकदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:16 AM2021-02-05T07:16:15+5:302021-02-05T07:16:15+5:30

कोल्हापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा मंगळवारी सकाळी सव्वानऊ वाजता छत्रपती शाहू स्टेडियम येथे पालकमंत्री ...

Flag hoisting by the Guardian Minister on Republic Day | प्रजासत्ताकदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

प्रजासत्ताकदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

Next

कोल्हापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा मंगळवारी सकाळी सव्वानऊ वाजता छत्रपती शाहू स्टेडियम येथे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण होईल.

शाहू स्टेडियम येथील समारंभात उल्लेखनीय काम केलेले अधिकारी व गुणवंत खेळाडू यांना गौरविण्यात येते. तरी नागरिकांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा, तसेच त्याचा अवमान होऊ नये, यासाठी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

--

ग्रामसभा नाहीच..

२६ जानेवारी रोजी गावागावात ग्रामसभा हाेतात. मात्र, जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच झाल्या असल्या तरी सरपंच निवड झालेली नाही. त्यामुळे मुदत संपलेल्या गावांचे कामकाज प्रशासकांकडून चालविले जात आहे. एका प्रशासकाकडे एकापेक्षा अधिक गावांचे कामकाज असल्याने त्यांना एकाचवेळी सर्व ठिकाणी ग्रामसभेला उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने ३१ मार्चपर्यंत ग्रामसभा स्थगित केल्या आहेत.

--

Web Title: Flag hoisting by the Guardian Minister on Republic Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.