राष्ट्रवादी कार्यालयात ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:14 AM2021-02-05T07:14:40+5:302021-02-05T07:14:40+5:30

कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शाहू मार्केट यार्ड येथील कार्यालयात जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ...

Flag hoisting at the NCP office | राष्ट्रवादी कार्यालयात ध्वजारोहण

राष्ट्रवादी कार्यालयात ध्वजारोहण

Next

कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शाहू मार्केट यार्ड येथील कार्यालयात जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, आसिफ फरास, संतोेष धुमाळ, संभाजी पाटील, सुरेश पाटील, आप्पासाहेब धनवडे, धनाजी पाटील, स्नेहल मठपती, विनायक चव्हाण आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : राष्ट्रवादी कॉेग्रेसच्या शाहू मार्केट यार्ड येथील कार्यालयात जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. (फोटो-२७०१२०२१-कोल-एनसीपी)

‘गोकुळ’मध्ये ध्वजारोहण

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ दूध प्रकल्प कार्यस्थळावर गोकुळचे ज्येष्‍ठ संचालक अरूण नरके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालय आवारात ज्येष्ठ संचालक रणजीतसिंह पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याचबरोबर संघाच्या दूध शीतकरण केंद्रावर तावरेवाडी येथे संचालक आमदार राजेश पाटील, बोरवडे येथे विलास कांबळे, लिंगनूर येथे रामराजे कुपेकर, गोगवे येथे अनुराधा पाटील, शिरोळ येथे सहाय्यक व्यवस्थापक एस. जी. अंगज, कागल पशुखाद्य कारखाना येथे सहाय्यक व्यवस्थापक मुजूमदार, गडमुडशिंगी येथे ज्येष्ठ कर्मचारी शिवाजी कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, बोर्ड सचिव एस. एम. पाटील, प्रशासन व्यवस्थापक डी. के. पाटील, सुरक्षा अधिकारी कुंडलिक कदम आदी उपस्थित होते.

फोटो ओळी :- गोकुळ दूध प्रकल्प येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्येष्‍ठ संचालक अरूण नर‍के यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संघाचे अधिकारी उपस्थित हाेते. (फोटो-२७०१२०२१-कोल-गोकुळ)

जिल्हा बँक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यकार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. बँकेचे संचालक खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक पी. जी. शिंदे, भैय्या माने, आर. के. पोवार, बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, असिफ फरास, संचालिका उदयानी साळुखे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी.माने, व्यवस्थापक जी. एम. शिंदे, आर. जे. पाटील, विकास जगताप, अशोकराव साळोखे, डी. एस. कालेकर, अजित पाटील, संतोष धुमाळ , कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळी : जिल्हा बँकेच्या मुख्यकार्यालयात बँकेचे संचालक खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उदयानी साळुंखे, भैय्या माने, पी. जी. शिंदे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, आर. के. पोवार, असिफ फरास, डॉ. ए. बी. माने, संतोष धुमाळ आदी उपस्थित होते. (फाेटो-२७०१२०२१-कोल-जिल्हा बँक)

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये अशासकीय मंडळाचे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सदस्य अजित पाटील, डी. जी. भास्कर, सचिव जयवंत पाटील, उपसचिव राहुल सूर्यवंशी, के. बी. पाटील, अधिकारी, कर्मचारी, अडते, व्यापारी, शेतकरी उपस्थित होते.

फोटो ओळी : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये के. पी. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अजित पाटील, जयवंत पाटील, राहुल सूर्यवंशी, के. बी. पाटील आदी उपस्थित होते. (फोटो-२७०१२०२१-कोल-बाजार समिती)

Web Title: Flag hoisting at the NCP office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.