मानोली येथील झेंडा पॉर्इंट भूमापनाचा दस्तऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:37 AM2017-12-25T00:37:51+5:302017-12-25T00:40:58+5:30

Flag of Jhanda Point Land in Manoli | मानोली येथील झेंडा पॉर्इंट भूमापनाचा दस्तऐवज

मानोली येथील झेंडा पॉर्इंट भूमापनाचा दस्तऐवज

Next

आर. एस. लाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आंबा : आंबा-विशाळगड जंगलाच्या माथ्यावरील मानोली सडा व तेथील झेंडा पॉर्इंट एक रमणीय स्थळ म्हणून येथे पर्यटक पसंती देत आहेत. पण हा झेंडा पॉर्इंट जिल्ह्याच्या भूमापनाचा प्रारंभ बिंदू असल्याचे शाहूवाडीचे तहसीलदार चंद्रशेखर सानप यांनी सांगितले. याठिकाणी दरवर्षी २५ डिसेंबरला महसूल विभाग पांढरा ध्वज फडकवत आहे.
कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्याची सीमारेषा या झेंडा पॉर्इंटपासून सुरू होते. सह्याद्रीच्या माथ्यावरील कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी, सातारा व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील सर्वांत उंच असे ठिकाण असून, येथून या पाच जिल्ह्यांच्या सीमा दिसतात. समुद्रकिनाºयानंतर पुढे सह्याद्रीच्या माथ्यावरील हे उंच ठिकाण म्हणून या सड्याला मोठे महत्त्व असल्याचे नायब तहसीलदार राजेंद्र पाटील यांनी सांगितले. म्हणूनच वर्षाच्या अखेरीस येथे महसूल विभागामार्फत पांढºया रंगाच्या कापडाचा झेंडा फडकवून या ठिकाणची ओळख वर्षानुवर्षे जपली जात आहे. ब्रिटीश काळात हे पठार कोकण व घाट प्रदेशाच्या अभ्यासाचे व सर्वेक्षणाचे होते. धोपेश्वर, पावनखिंड व विशाळगड या मध्यवर्ती भागातील हे उंच पठार शिवरायांच्या स्वराज्यात टेहळणीचे ठिकाण बनले होते. तीन किलोमीटरवर धोपेश्वर हे पांडवकालीन मंदिर आहे. पूर्वी येथे कळकवाडी गाव वसले होते.
या कड्यालगत दरीत अस्वलांचा वावर होता. यावरून याला अस्वलाचा कडा असेही संबोेधतात. येथून एक किलोमीटरवर वाणीझरा नावाचा जिवंत बारमाही पाणवठा खळाळतो. झेंडा पॉर्इंटपुढे धोपेश्वर हद्दीत बॉक्साईटचे उत्खनन होत आहे. वनविभाग याच पठारावरून पदभ्रमंती मार्ग विकसित करीत आहे. सभोवतालचा ऐेतिहासिक व जैविक संपन्नतेचा परिसर जागतिक वारसा स्थळाचा मान घेऊन आहे. शिवाय इको झोनचा पट्टा म्हणून वनविभागाने शिक्कामोर्तब केले आहे. दरवर्षी येथे महसूल विभागाच्या वतीने पांढºया कापडाचा झेंडा उभारतात. या ठिकाणची ओळख भक्कम ठेवण्यास या पॉर्इंटचे पक्के बांधकाम करून कापडाऐवजी टिकावू निशाण उभारण्याची गरज आहे.
झेंडा पार्इंट बनला सेल्फी पॉर्इंट..
मानोली सडा ते धोपेश्वर असा सुमारे पाचशे एकर क्षेत्राचा भव्य पठार आहे. श्रावणात हा पठार विविध रानफुलांनी बहरतो. घनघोर पाऊस अनुभवयाचा तर येथेच. विविध प्राण्यांचा वावर ही येथील वैशिष्ट्ये. दुर्मीळ मलबार पिट वायपर हा दुर्मीळ विषारी सर्प या पॉर्इंटकडे जाणाºया पायवाटेवर
दिसतो. भिवतळी ते झेंडा पॉर्इंट हा चार किलोमीटरचा जंगलातील चढणीचा मार्ग. भव्य अशा दरीकडचा हा झेंडा पॉर्इंट तरूणाईचा सेल्पी पॉर्इंट बनला आहे. पूर्वेकडचे भव्य पठार तर पश्चिमेकडे दूरवर उतारावर विसावलेली कोकण भूमी दक्षिणेला विशाळगड, तर उत्तरेला आंब्याचे विलोभनीय घाटमाथे निसर्गप्रेमींना नेहमीच हाकारत आहेत. निसर्गप्रेमी व अभ्यासकांनी येथील निसर्गाचा आनंद लुटताना येथील परिसराचे महत्त्व जपण्याची गरजही आहे.

Web Title: Flag of Jhanda Point Land in Manoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.