गाळप, साखर उत्पादनात कोल्हापूरचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 10:08 PM2020-03-01T22:08:26+5:302020-03-01T22:08:31+5:30
कोपार्डे : महाराष्ट्रात यावर्षी आठ विभागांत ४४७ लाख २४ हजार मे. टन उसाचे गाळप झाले असून, ११.०१ सरासरी साखर ...
कोपार्डे : महाराष्ट्रात यावर्षी आठ विभागांत ४४७ लाख २४ हजार
मे. टन उसाचे गाळप झाले असून, ११.०१ सरासरी साखर उताऱ्यासह ४९२ लाख ८९ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. यात कोल्हापूर विभाग आघाडीवर असून, कोल्हापूर विभागातील ३५ साखर कारखान्यांनी १५३ लाख १५ हजार मे. टन उसाचे गाळप करून १८४ लाख क्विंटल साखर उत्पादित करून आघाडी घेतली आहे.
राज्यात झालेल्या अतिरिक्त पाऊस व महापुराने उसाचे आगर असणाºया कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे या प्रमुख चार जिल्ह्यांत उसाचे मोठे नुकसान झाले. यामुळे साखर कारखाने आपले गाळप उद्दिष्ट गाठू शकणार नाही, असा शासकीय पातळीवरही अंदाज बांधण्यात येत होता; पण नोव्हेंबर महिन्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली आणि यामुळे उसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने महापुराने नुकसान झालेले क्षेत्र वगळता इतर क्षेत्रातील उसाला याचा फायदा होऊन उत्पादन वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले.
हंगाम २०१९/२० मध्ये उसाच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याने राज्यातील केवळ १४५ साखर कारखाने आपला हंगाम सुरू करू शकले; पण उसाच्या अभावी फेब्रुवारी महिन्यातच २२ साखर कारखान्यांना आपला गाळप हंगाम गुंडाळावा लागला आहे. आणखी ५० साखर कारखाने मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपला गाळप हंगाम उसाअभावी बंद करणार आहेत. गाळप उद्दिष्ट गाठण्यासाठी कारखानदारांना ऊस देण्यासाठी शेतकऱ्यांच्या विनवण्या कराव्या लागत आहेत. बहुतांश कारखाने मागील हंगामाच्या गाळप आकडेवारीजवळ पोहोचू शकणार नाहीत, अशीच परिस्थिती राज्यातील कारखान्यांची आहे.
या हंगामात (२०१९-२०) राज्यातील आठ विभागांत कोल्हापूर विभाग ऊस गाळप, साखर उत्पादन व उताºयात आघाडीवर आहे, तर पुणे विभाग दुसºया क्रमांकावर आहे. सर्वांत कमी गाळप व साखर उत्पादन अमरावती व नागपूर विभागांत झाले आहे.
हंगाम दृष्टिक्षेपात....
४महापुराचा उत्पादनावर परिणाम
४परतीच्या पावसाने मात्र हंगामाला हात
४पुणे विभाग गाळप, उत्पादनात दुसºया स्थानावर
४अमरावती, नागपूर विभाग सर्वांत मागे
४ १४५ कारखान्यांनी घेतला हंगाम
राज्यातील साखर हंगामातील विभागवार एकूण गाळप, साखर उत्पादन व उतारा पुढीलप्रमाणे
विभाग ऊस गाळप साखर उत्पादन उतारा
(लाख मे. टन) (लाख क्विंटल) (टक्के)
कोल्हापूर १५३.१५ १८४.५९ १२.०५
पुणे ११५.७६ १२८.०४ ११.०४
सोलापूर ६२.४५ ६२.३५ ९.९८
अहमदनगर ५१.५९ ५२.४८ १०.१७
औरंगाबाद ३२.९० ३२.२० ९.७९
नांदेड २४.१८ २५.५९ १०.५८
अमरावती ३.९१ ३.९७ १०.१६
नागपूर ३.३२ ३.१७ ९.५७
एकूण ४४७.२४ ४९२.३९ ११.०१