राखीव मतदारसंघांतही फुलले कमळ
By admin | Published: October 23, 2014 12:31 AM2014-10-23T00:31:55+5:302014-10-23T00:44:50+5:30
पारंपरिक मतांनादेखील खिंडार पाडल्याचे सिद्ध झाले. विधानसभा निवडणुकीतसुद्धा भाजपने कॉँग्रेसची ही पारंपरिक मते आपल्याकडे ओढली.
असिफ कुरणे - कोल्हापूर --दलित, आदिवासी, मुस्लिम मते ही कॉँग्रेसची पारंपरिक मते मानली जात होती; पण लोकसभेतील मोदी लाटेने या पारंपरिक मतांनादेखील खिंडार पाडल्याचे सिद्ध झाले. विधानसभा निवडणुकीतसुद्धा भाजपने कॉँग्रेसची ही पारंपरिक मते आपल्याकडे ओढली. एवढेच नव्हे, तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघावर देखील ताबा मिळविला आहे. २००९च्या निवडणुकीत अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या २८ मतदारसंघांपैकी कॉँग्रेस- सात, भाजप- सात, राष्ट्रवादी- सहा, तर शिवसेनेकडे आठ मतदारसंघ होते; पण २०१४ च्या निवडणुकीत भाजपने २८ पैकी अर्ध्या म्हणजे १४ जागांवर विजय मिळविला आहे. शिवसेनेने आठ, तर राष्ट्रवादी कॉँग्रसने- तीन मतदारसंघांत विजय मिळविला. कॉँग्रेसला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. अनुसूचित जाती मतदारसंघाप्रमाणे अनुसूचित जमातीसाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघावरदेखील भाजपाचा वरचष्मा राहिला आहे. २४ मतदारासंघांपैकी ११ मतदारसंघांवर भाजपचा ताबा आहे, तर कॉँग्रेस, शिवसेनेला चार- चार मतदारसंघांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीकडे तीन, बहुजन विकास आघाडी आणि माकपकडे प्रत्येकी एक मतदारसंघ राहिला.
एस.सी. मतदारसंघातील विजयी उमेदवार
संजय रायमूरकर( शिवसेना)
हरीष पिंपळे ( भाजप)
लखन मलिक ( भाजप )
रमेश बुंदेले ( भाजप )
सुधीर पारवे ( भाजप )
मिलिंद माने ( भाजप )
रामचंद्र अवतारे ( भाजप )
राजकुमार बंडोले ( भाजप )
नानाजी शामकुले (भाजप)
राजेंद्र नाजरधने (भाजप)
सुभाष साबणे(शिवसेना)
नारायण कुचे (भाजप)
संजय शिरसाट (शिवसेना)
योगेश घोलप (शिवसेना)
बालाजी किणीकर (शिवसेना)
मंगेश कुडाळकर ( शिवसेना)
वर्षा गायकवाड( काँग्रेस )
दिलीप कांबळे ( भाजप )
गौतम चाबुकस्वार ( शिवसेना )
भाऊसो कांबळे ( काँग्रेस )
संगीता ठोंबरे ( भाजप )
सुधाकर भालेराव(भाजप)
ज्ञानराज चौगुले (शिवसेना)
रमेश कदम ( राष्ट्रवादी)
हणमंत डोळस ( राष्ट्रवादी)
दीपक चव्हाण ( राष्ट्रवादी)
सुजित मिणचेकर(शिवसेना)
सुरेश खाडे(भाजप )
‘एस.टी’ राखीव
विजयी उमेदवार
के. सी. पाडवी ( काँग्रेस )
उदय पाडवी( भाजप )
विजयकुमार गावित( भाजप )
सुरुपसिंह नाईक( काँग्रेस )
डी. एस. अहिरे (काँग्रेस )
काशीराम पावरा (काँग्रेस )
चंद्रकांत सोनवणे (शिवसेना )
प्रभूदास भिलावेकर( भाजप )
संजय पुराम( भाजप )
कृष्णा गजबे ( भाजप )
देवराव होळी( भाजप )
अंबरीष अत्राम( भाजप )
अशोक वुइके( भाजप )
राजू तोडसाम( भाजप )
दीपिका चव्हाण(राष्ट्रवादी )
जीवा गावित(माकप)
नरहरी झिरबाळ( राष्ट्रवादी)
पास्कल धनागरे( भाजपा )
प्रकाश धिनारे( भाजपा )
कृष्णा घोडा ( शिवसेना )
विलास तरे(बविआ)
शांताराम मोरे(शिवसेना )
पांडुरंग वरोरा (राष्ट्रवादी )
वैभव पिचड ( शिवसेना)