महापूर फोटो ओळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:25 AM2021-07-27T04:25:39+5:302021-07-27T04:25:39+5:30
२६०७२०२१-कोल-कोल्हापूर महापूर ०१, ०२ फोटो ओळ : कोल्हापुरात सोमवारी महापूर ओसरू लागल्यानंतर लक्ष्मीपुरी येथील दुकानांमध्ये साफसफाई जोरात सुरू होती. ...
२६०७२०२१-कोल-कोल्हापूर महापूर ०१, ०२
फोटो ओळ : कोल्हापुरात सोमवारी महापूर ओसरू लागल्यानंतर लक्ष्मीपुरी येथील दुकानांमध्ये साफसफाई जोरात सुरू होती. (नसीर अत्तार)
२६०७२०२१-कोल-कोल्हापूर महापूर ०३
फोटो ओळ : कोल्हापुरातील लक्ष्मीपुरीतील पूर ओसरल्यानंतर रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य होते, तसे अग्निशमक दलाकडून पाण्याचा फवारा मारुन रस्ते धुण्याचे काम केले जात होते. (नसीर अत्तार)
२६०७२०२१-कोल-कोल्हापूर महापूर ०४, ०५
फोटो ओळ : कोल्हापुरात आलेल्या महापुरात पंपिंग स्टेशन बुडाल्याने शहरात पाणीटंचाई आहे. पिण्यासाठी शुध्द पाणी देणाऱ्या पेयजलसमोर अशा रेशनसारख्या रांगा लागल्याचे चित्र सोमवारी सर्वत्र दिसत होते. (नसीर अत्तार)
२६०७२०२१-कोल-कोल्हापूर महापूर ००६
फोटो ओळ : पिण्यासाठी, खर्चासाठी घरात पाणीच शिल्लक नसल्याने महिला वर्गाला असे गाड्यावरुन पाणी वाहून आणण्याची शक्कल लढवावी लागली. (नसीर अत्तार)
२६०७२०२१-कोल-कोल्हापूर महापूर ०७
फोटो ओळ : पूर ओसरल्यानंतर कोल्हापुरातील शाहूपुरीत स्वच्छता मोहीम युध्दपातळीवर राबवली जात होती. (नसीर अत्तार)
२६०७२०२१-कोल-कोल्हापूर महापूर ०८
फोटो ओळ :
कोल्हापूरकर पुन्हा उठून उभा राहिले..
कोल्हापुरात पाऊस थांबून सोमवारी कडकडीत ऊन पडल्याने महाद्वार रोडवर खरेदीसाठी नागरिकांनी गर्दीच गर्दी दिसत होती. महापुराचा विळखा सैल झाल्याचेच चित्र त्यातून अधोरेखित झाले. (नसीर अत्तार)
२६०७२०२१-कोल-कोल्हापूर महापूर ०९
फोटो ओळ: लक्ष्मीपुरीतील विल्सन पुलाजवळ मोठ्याप्रमाणावर गाळ साचल्याने पोकलॅण्ड मशीनने गाळ बाजूला करून वाहतुकीसाठी रस्ता खुला केला जात होता. (नसीर अत्तार)
२६०७२०२१-कोल-कोल्हापूर महापूर १०
फोटो ओळ : कोल्हापुरातील शाहूपुरीत सलून दुकानाचे साहित्य पुरात बुडाल्याने ते सोमवारी पूर ओसरल्यानंतर लगेच स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले. (नसीर अत्तार)
२६०७२०२१-कोल-कोल्हापूर महापूर ११
फोटो ओळ : महापुराने गोरगरिबांचा सर्व प्रपंच रस्त्यावर आणला. शाहूपुरी पाचव्या गल्लीतील हे गरीब कुटुंब बुडालेले प्रापंचिक साहित्य सावरताना दिसत होते. संकट आले तरी ते मागे टाकून जगण्याची नवी उमेद त्यांच्या चेहऱ्यावर स्वच्छपणे दिसत होती (नसीर अत्तार)