भुदरगड तालुक्यात पूर ओसरला, कोल्हापूर - गारगोटी मार्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:23 AM2021-07-26T04:23:54+5:302021-07-26T04:23:54+5:30

गारगोटी : भुदरगड तालुक्यात गेले दोन दिवस पावसाने उसंत घेतल्याने पूर ओसरू लागला आहे. शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर ...

Flood recedes in Bhudargad taluka, Kolhapur-Gargoti road started | भुदरगड तालुक्यात पूर ओसरला, कोल्हापूर - गारगोटी मार्ग सुरू

भुदरगड तालुक्यात पूर ओसरला, कोल्हापूर - गारगोटी मार्ग सुरू

googlenewsNext

गारगोटी : भुदरगड तालुक्यात गेले दोन दिवस पावसाने उसंत घेतल्याने पूर ओसरू लागला आहे. शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ते खुले झाले असून, आमदार प्रकाश आबिटकर यांनी पूरग्रस्त भागात भेट देऊन नुकसानाची पाहणी केली.

वेदगंगा नदीचा महापूर ओसरल्याने गारगोटी - कोल्हापूर महामार्ग रविवार सकाळपासून वाहतुकीसाठी खुला झाला. यासोबत गारगोटी - पाटगाव, गारगोटी - गडहिंग्लज हे मार्गदेखील खुले झाले आहेत. या पावसाने अनेक गावांमध्ये २४ घरे पूर्णतः पडली असून, ३९ लाख ३० हजार रुपये, १२९ घरे अंशतः पडून ३५ लाख ५ हजार रुपये, ३१ गोठ्यांची पडझड होऊन २० लाख ८० हजार रुपये असे एकूण ९५ लाख १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कोळवण, म्हसवे, मडीलगे बुद्रुक, डेळे पैकी भारमलवाडी येथे डोंगर खचले आहेत. तर पाल, टिक्केवाडी येथील भुजाई मंदिर रस्ता, पडखंबे खोतवाडी या रस्त्यावर दरडी कोसळल्या आहेत. करिवडे हणफोडीवाडी रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे. कडगाव शिसेवाडी रस्ता तुटला आहे तर नांदोली देऊळवाडी पुलाजवळ रस्त्याची साईडपट्टी वाहून गेली आहे. कडगाव - ममदापूर रस्त्यावर गावठाण हद्दीतील संरक्षक भिंत तुटली आहे.

फोटो : १) आमदार आबिटकर यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते. २)पडखंबे रस्त्यावर दरड कोसळली. त्याची पाहणी बिद्रीचे संचालक के. ना. पाटील यांनी केली. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Flood recedes in Bhudargad taluka, Kolhapur-Gargoti road started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.