कोल्हापूरला महापुराचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 01:09 AM2020-08-06T01:09:47+5:302020-08-06T01:10:36+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून धुवाधार पाऊस सुरू असल्याने पंचगंगा नदीचे पाणी यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच पात्राबाहेर पडले आहे.

Flood threat to Kolhapur | कोल्हापूरला महापुराचा धोका

कोल्हापूरला महापुराचा धोका

Next

मुंबई : कोल्हापुरात गगनबावड्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला. धरण क्षेत्रात धुवांधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी तब्बल १९ फुटांनी वाढली असून ८६ बंधारे पाण्याखाली गेल्याने पुन्हा महापुराचा धोका निर्माण झाला राधानगरी वारणा धरणाच्या साठ्यात चांगली वाढ झाली आहे.

पंचगंगेला पूर...
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून धुवाधार पाऊस सुरू असल्याने पंचगंगा नदीचे पाणी यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच पात्राबाहेर पडले आहे. नदीचे पाणी पुराच्या इशारा पातळीवरून वाहू लागले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांचे स्थलांतर सुरू केले आहे.
नृसिंहवाडीत दत्त मंदिरात पाणी गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस व धरण क्षेत्रातील अतिवृष्टी यामुळे शिरोळ तालुक्यातील पंचगंगा, कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात कृष्णा नदीचे पाणी आले आहे.

Web Title: Flood threat to Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.