पूरग्रस्त व्यापारी, उद्योजकांना लवकर नुकसानभरपाई मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:26 AM2021-07-28T04:26:13+5:302021-07-28T04:26:13+5:30

कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री पवार यांनी पूरग्रस्त व्यापारी, व्यावसायिकांच्या नुकसानाची माहिती त्यांच्या प्रत्यक्ष दुकानाजवळ जाऊन घेतली. दरम्यान, व्यापार आणि ...

Flooded traders, entrepreneurs should get early compensation | पूरग्रस्त व्यापारी, उद्योजकांना लवकर नुकसानभरपाई मिळावी

पूरग्रस्त व्यापारी, उद्योजकांना लवकर नुकसानभरपाई मिळावी

googlenewsNext

कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री पवार यांनी पूरग्रस्त व्यापारी, व्यावसायिकांच्या नुकसानाची माहिती त्यांच्या प्रत्यक्ष दुकानाजवळ जाऊन घेतली. दरम्यान, व्यापार आणि उद्योग सुरू करण्यासाठी एक लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत तातडीने मिळावी. कर्जावरील ऑगस्टपासूनचे पुढील सहा महिन्यांचे व्याज माफ व्हावे. कोणतीही कारवाई न करण्याबाबत बँकांना आदेश द्यावेत. कर्जाचे हप्ते भरण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी. सहा महिन्यांचे व्याज माफ करावे. विमा कंपन्यांना सर्व्हेक्षण करून १५ दिवसांच्या आत प्रकरणे निर्गत करण्यासाठी आदेश द्यावेत. त्याचबरोबर अंतरिम रक्कम तत्काळ देण्यास सांगावे, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेबाबत शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी ‘कोल्हापूर चेंबर’ चे अध्यक्ष संजय शेटे यांनी केली. यावेळी ‘कोल्हापूर चेंबर’चे सचिव धनंजय दुग्गे, माजी अध्यक्ष आनंद माने, संचालक अजित कोठारी, प्रशांत शिंदे उपस्थित होते.

Web Title: Flooded traders, entrepreneurs should get early compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.