पूरबाधितमुळे जिल्ह्यातील ७३ मतदान केंद्रात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 04:07 PM2019-10-17T16:07:24+5:302019-10-17T16:08:52+5:30
पूरबाधित किंवा पडझड झालेल्या जिल्ह्यातील एकूण ७३ मतदान केंद्रांमध्ये बदल करण्यात आला आहे. विधानसभेसाठी सोमवारी (दि. २१) जिल्ह्यातील १0 मतदारसंघात मतदान होत आहे. दरम्यान, पूरस्थितीमुळे अनेक मतदान केंद्रांची पडझड झालेली असल्याने ही केंद्रे बदलण्यात आली आहेत. ते खोलीतील मतदान इतरत्र घेण्यात आले आहे.
कोल्हापूर : पूरबाधित किंवा पडझड झालेल्या जिल्ह्यातील एकूण ७३ मतदान केंद्रांमध्ये बदल करण्यात आला आहे. विधानसभेसाठी सोमवारी (दि. २१) जिल्ह्यातील १0 मतदारसंघात मतदान होत आहे. दरम्यान, पूरस्थितीमुळे अनेक मतदान केंद्रांची पडझड झालेली असल्याने ही केंद्रे बदलण्यात आली आहेत. ते खोलीतील मतदान इतरत्र घेण्यात आले आहे.
पाऊस येण्याची शक्यता असल्याने आडोसा नसणाऱ्या केंद्रावर तात्पुरता मंडप घातला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये जी मतदार केंद्रे होती, त्यामध्ये थोडा बदल केला आहे. मतदारांना याची माहिती व्हावी; यासाठी ज्या-त्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा निवडणूक अधिकाऱ्यांकडे याची माहिती दिली जात आहे.
चंदगड तालुक्यातील खणदाळ, नेसरी, तळेवाडी, काळामवाडी, सातवणे, चिंचणे, राजगोळी खुर्द, कागणी, बसर्गे, बुक्कीहाळ, बुक्कीहाळ खुर्द गावातील मतदान केंद्रामध्ये बदल केला आहे.
राधानगरी तालुक्यातील सावतवाडी, कुर, नवरसवाडी, काळम्मावाडी, गिरगाव, वेंगरुळ, सोनुर्ली, पारपोली, वेळवट्टी, लाटगाव, चिखलीगाव, बाळेघोल, भादवण. कागल विधानसभेमध्ये गडहिंग्लज, शिप्पूर तर्फ आजरा. कोल्हापूर दक्षिणमधील राजलक्ष्मीनगर, नानापाटीलनगर फुलेवाडी रिंग, नाना पाटील नगर, फुलेवाडी, रिंग रोड, सुर्वे नगर, साळोखे, विक्रमनगर, अवचित नगर, बाबा जरग नगर, स्वामी विवेकानंद अभ्यासिकाजवळ, लक्ष्मीबाई जरगनगर, बाबा जरग नगर, सम्राटनगर, गांधीनगर. बाजार भोगाव, कळे, तिसंगी, खुपिरे, कुडित्रे, नागाळा पार्क. हातकणंगलेमधील कुंभोज. इचलकरंजीमध्ये चंदूरकुमार विद्या मंदिरमधील १ व २ खोलीमध्ये होईल. शिरोळमधील उमळवाड, धरणगुत्ती, शिरटीकुमार, शिरढोण, कुरुंदवाड या गावांतील मतदान केंद्रामध्ये किरकोळ बदल केला आहे.