‘लोकगंगे’ला महापूर; ‘लोकमत’ला बळ

By admin | Published: August 21, 2016 12:59 AM2016-08-21T00:59:04+5:302016-08-21T01:00:40+5:30

तपपूर्ती वर्धापनदिन : स्नेहमेळाव्यास सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

Flooding of 'Lokgange' Force Lokmat | ‘लोकगंगे’ला महापूर; ‘लोकमत’ला बळ

‘लोकगंगे’ला महापूर; ‘लोकमत’ला बळ

Next

कोल्हापूर : इंद्रधनुषी रांगोळीचा गालिचा, सनई-चौघड्याचा मंजूळ स्वर, तुतारीचा निनाद, वाचक व कोल्हापूरकरांचा उदंड प्रतिसाद अशा अविस्मरणीय वातावरणात शनिवारी ‘लोकमत’चा तपपूर्ती वर्धापनदिन उत्साहात पार पडला. दमदार पावसाने पंचगंगेला आलेला महापूर ओसरला असला तरी ‘लोकमत’ला बळ देण्यासाठी लोकगंगेला महापूर आल्याचे सुखद चित्र अनुभवण्यास मिळाले. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांनी ‘लोकमत’च्या वर्धापनदिन सोहळ््यास उपस्थिती लावून वाटचालीस भक्कम शुभेच्छांचे पाठबळ दिले.
‘जिथे मराठी, तेथे लोकमत’ या ब्रीदवाक्यानुसार वाटचाल करीत महाराष्ट्राचा मानबिंदू बनलेल्या ‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीचा तपपूर्ती वर्धापनदिन ताराबाई पार्कातील धैर्यप्रसाद सांस्कृतिक सभागृहात झाला. स्नेहमेळाव्याचे उद्घाटन ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांचे प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलनाने श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व महसूल आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विमल पाटील, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख प्रमुख उपस्थित होते. यावेळी तपपूर्ती वर्धापनदिनानिमित्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या ‘कोल्हापुरी उद्योग’ या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
रांगड्या कोल्हापूरकरांशी आपुलकीचे नाते निर्माण करणाऱ्या आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेचे व्रत जपणाऱ्या ‘लोकमत’च्या असंख्य वाचकांनी स्नेहमेळाव्यास उत्स्फूर्त उपस्थिती लावली. स्नेहमेळाव्याची वेळ सायंकाळी पाच वाजताची होती परंतू त्याच्या अगोदरपासूनच लोकांची रीघ सुरु झाली. बघता बघता सभागृह खचाखच भरून गेले. व्यासपीठावर तर भली मोठी रांगच लागली होती. जिकडे पाहावे तिकडे लोकांचा महापूरच दिसत होता. पावसाने दिवसभर चांगली उसंत दिल्याने वातावरणातही चैतन्य पसरले होते. एरव्ही रोजच्या धकाधकीच्या जीवनात सहजपणे न भेटणारे अनेकजण या निमित्ताने भेटल्याने त्यांचाही एक वेगळाच स्नेहमळावा झाला.
या सर्वांचे स्वागत ‘लोकमत सखी मंच’च्या सदस्यांनी गुलाबपुष्प आणि पेढा देऊन केले. मुख्य प्रवेशद्वाराजवळ ‘लोकमत’ परिवारातील सदस्य आणि भालदार-चोपदारांकडून येणाऱ्यांचे शाही स्वागत करण्यात आले. रात्री दहा वाजेपर्यंत वाचकांच्या गर्दीचा ओघ कायम राहिला. रंगीबेरंगी फुलांनी आणि आकर्षक विद्युत रोषणाईने सजलेल्या रंगमंचावर उभे राहून ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला.
शुभेच्छा देण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, खासदार संभाजीराजे छत्रपती, महापौर अश्विनी रामाणे, आयुक्त पी. शिवशंकर, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, वसुधा पवार, श्रीमती उमा पानसरे, मेघा पानसरे, प्रतिमा पाटील, उपमहापौर शमा मुल्ला, ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव, आमदार चंद्रदीप नरके, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार पी. एन. पाटील, नामदेवराव भोईटे, संपतराव पवार-पाटील, शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, संजय मंडलिक, गोकुळचे अध्यक्ष विश्र्वास पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, ‘बीसीयूडी’ संचालक डॉ. डी. आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे अध्यक्ष संजय डी. पाटील, उद्योजक बाबाभाई वसा, दिलीप मोहिते, व्ही.बी.पाटील, बाळ पाटणकर, क्रिडाईचे महेश यादव, राजीव परीख, मोहन मुल्हेरकर, देवेंद्र दिवाण, प्रदीपभाई कापडिया, ललित गांधी,चंद्रशेखर डोली, सचिन पाटील, स्मॅकचे उपाध्यक्ष राजू पाटील, पदमाकर सप्रे, कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश मोरे, अ‍ॅड. शिवाजीराव राणे,अजित मोहिते, उपवन संरक्षक रंगनाथ नाईकडे, शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, करवीर पोलिस उपअधीक्षक अमरसिंह जाधव, गृह पोलिस उपअधीक्षक सतिश माने, हिंदकेसरी दीनानाथसिंह, रुस्तुम-ए-हिंद दादू चौगुले, हिंदकेसरी विनोद चौगुले, चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत जोशी, राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, प्रख्यात बाल मेंदू रोगतज्ञ डॉ. विलास जाधव, डॉ. शिल्पा जाधव, डॉ.धनंजय गुंडे आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

‘लोकमत’च्या तपपूर्ती वर्धापनदिनानिमित्त कोल्हापुरात शनिवारी आयोजित स्नेहमेळाव्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह कोल्हापूरकरांनी ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. ‘लोकमत’च्या तपपूर्ती वर्धापनदिनानिमित्त कोल्हापुरात शनिवारी आयोजित स्नेहमेळाव्यात खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते केक कापून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी डावीकडून नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत, ‘लोकमत’चे उपव्यवस्थापक (मनुष्यबळ व प्रशासन) संतोष साखरे, आयुक्त पी. शिवशंकर, प्रतिमा पाटील, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, आमदार प्रकाश आबिटकर, ‘लोकमत’चे मुख्य बातमीदार विश्वास पाटील उपस्थित होते.

‘लोकमत’च्या तपपूर्ती वर्धापनदिनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेला ‘कोल्हापुरी उद्योग’ हा विशेषांक शनिवारी करवीरनिवासिनी अंबाबाईदेवीच्या चरणी अर्पण करण्यात आला.

कोल्हापुरात शनिवारी आयोजित स्नेहमेळाव्यात ‘कोल्हापुरी उद्योग’ विशेषांकाचे प्रकाशन कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत व खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते झाले. यावेळी शेजारी डावीकडून ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे उपस्थित होते.


कौतुक असेही..
स्नेहमेळाव्यास उपस्थित असलेल्या अनेकांनी ‘लोकमत’च्या कोल्हापुरी उद्योग या विशेषांकाचे तोंडभरून कौतुक केलेच त्याशिवाय तितक्याच लोकांनी ‘लोकमत’चा रोजचा अंकही अतिशय वाचनीय निघत असल्याचे आवर्जून सांगितले. आता आम्ही फक्त ‘लोकमत’च घेतो आणि तो वाचून आमच्या सकस वाचनाची भूक चांगल्या रितीने भागत असल्याच्या प्रतिक्रियाही लोकांनी उस्फूर्तपणे व्यक्त केल्या. या भावनांमुळे ‘लोकमत’ वरील विश्र्वास अधिक दृढ होण्यास कारणीभूत ठरल्या.


‘लोकमत’च्या तपपूर्ती वर्धापनदिनानिमित्त कोल्हापुरात शनिवारी आयोजित स्नेहमेळाव्यात ‘कोल्हापुरी उद्योग’ विशेषांकाचे प्रकाशन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी डावीकडून ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विमल पाटील, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक,
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले उपस्थित होते.

Web Title: Flooding of 'Lokgange' Force Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.