महापुराने शेतीचे ९४ कोटी ५२ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:26 AM2021-08-26T04:26:46+5:302021-08-26T04:26:46+5:30

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापुराने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून ३३ टक्केच्यावर नुकसान झालेले ...

Floods cause damage of Rs 94.52 crore to agriculture | महापुराने शेतीचे ९४ कोटी ५२ लाखांचे नुकसान

महापुराने शेतीचे ९४ कोटी ५२ लाखांचे नुकसान

Next

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महापुराने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून ३३ टक्केच्यावर नुकसान झालेले जिल्ह्यातील २ लाख ६६ हजार शेतकऱ्यांचे ७३ हजार ९२३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यातून ९४ कोटी ५२ लाखाचे नुकसान झाले आहे. एकूण नुकसानीपैकी ५३ हजार हेक्टर (७२ टक्के) क्षेत्र हे करवीर, पन्हाळा, शाहूवाडी व शिरोळ तालुक्यातील आहे.

जिल्ह्यात महापूर येऊन महिना उलटला असून शेतीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिरायत, बागायत, फळपिके असे पंचनामे करताना वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार बागायत पिकांचे मोठे नुकसान झाले असून यामध्ये ऊस ५९ हजार ६४० हेक्टर बाधित झाला आहे. भाताचेही ७ हजार ४७५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्याचे १० कोटी ५३ लाखांचे नुकसान झाले आहे. महापूर व अतिवृष्टीचा फटका पन्हाळा, शाहूवाडी, करवीर, हातकणंगले व शिरोळ तालुक्याला बसला आहे. या चार तालुक्यातील ५३ हजार ६५५ हेक्टर क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाली असून त्यांचे ६९ कोटी ५६ लाखांचे नुकसान झाले आहे.

६६ हेक्टरमधील फळपिके उद्ध्वस्त

महापूर व अतिवृष्टीने जिल्ह्यातील ६६ हेक्टरमधील फळपिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्याचे ११ लाखांचे नुकसान झाले असून सर्वाधिक नुकसान शिरोळ तालुक्यात ३० हेक्टरचे झाले आहे.

तालुकानिहाय ३३ टक्केच्या वर नुकसान झालेले क्षेत्र हेक्टरमध्ये असे-

तालुका एकूण बाधित शेतकरी जिरायत क्षेत्र बागायत क्षेत्र फळ पीक एकूण क्षेत्र अपेक्षित निधी कोटी

करवीर ३९२३४ ७२८. ३३ ३३८.२३ ०.३९ १०२२८.८३ १३.७२

कागल १८८५० ९७१.२३ ३४८६.७२ ०.४७ ४४५८.४२ ५.६२

राधानगरी १७१५८ ८०३.२० १५१४.७८ ४.३५ २३२२.३३ ३.०१

गगनबावडा ९००० ९४६.५० ३०६०.०० २.८० ४००९.३० ५.१८

पन्हाळा २८००३ ५८५.११ ६३२२.८५ ०.२५ ६९०८.२१ ९.३१

शाहूवाडी २५६४६ १०८०.२१ ३८४१.३९ ५.१६ ४९२६.७६ ६.४६

हातकणंगले २६७०३ १६५२.८० ९३१९.१७ १.६० ११२७३.५७ १४.११

शिरोळ ४७३८७ २२१२.४८ १८०७७.४४ ३०.८४ २०३२०.७६ २५.९६

गडहिंग्लज १०६०३ ६४३.३१ १३८२.२४ - २०२५.५५ ३.२२

आजरा ६८९० ५८५.६५ ३७५.५५ १८.०० ९७९.२० ०.९२

चंदगड २३७१० २५५२.९६ १५४९.९९ ०.१५ ४१०३.१० ३.९६

भुदरगड १३५२६ ७८०.५९ १५८४.८६ २.४० २३६७.८५ ३.०१

एकूण २,६६,७१० १३,५४२.३७ ६०,३१५.१० ६६.४१ ७३,९२३.८८ ९४.५२

पीकनिहाय असे झाले नुकसान -

पीक बाधित क्षेत्र हेक्टर

ऊस ५९,६४०.७२

भात ७४७५.१७

सोयाबीन ३२७६.३३

भुईमूग १६८४.१७

नागली ९०३.७४

भाजीपाला ४७१.९९

केळी ७७.९८

फुलपिके ७२.५०

Web Title: Floods cause damage of Rs 94.52 crore to agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.