महापुरामुळे सीमाभागाला जोडणारे रस्ते गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:09 AM2021-08-02T04:09:44+5:302021-08-02T04:09:44+5:30

आठवडाभरात दूधगंगा नदीला महापूर आला. या महापुरात शिरोळ तालुक्यातून सीमाभागात जोडणारे रस्ते पाण्याखाली गेले. यात दानवाड- एकसंबा, दत्तवाड-सदलगा, याबरोबरच ...

The floods have washed away the roads connecting the border areas | महापुरामुळे सीमाभागाला जोडणारे रस्ते गेले वाहून

महापुरामुळे सीमाभागाला जोडणारे रस्ते गेले वाहून

Next

आठवडाभरात दूधगंगा नदीला महापूर आला. या महापुरात शिरोळ तालुक्यातून सीमाभागात जोडणारे रस्ते पाण्याखाली गेले. यात दानवाड- एकसंबा, दत्तवाड-सदलगा, याबरोबरच बोरगाव-सदलगा व बोरगाव-बेडकीहाळ या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर असणाऱ्या नदीच्या पुलांचा भराव वाहून गेला आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर या गोष्टी निदर्शनास आल्या. बोरगाव-बेडकीहाळ दरम्यान असणाऱ्या दूधगंगा नदीवरील पुलाला जोडणारा भराव वाहून गेला होता. त्यामुळे तो रस्ता बंद करण्यात आला होता; पण तात्पुरता मुरूम टाकून तो रस्ता सुरू करण्यात आला आहे. मात्र, सदलगा-बोरगाव रस्त्यावरील सदलगा बाजूचा रस्ता वाहून गेला असून, पाणी उतरल्यानंतर ही गोष्ट निदर्शनास आली आहे. हा रस्ता बंद आहे, तर दत्तवाड-सदलगा रस्त्यावरील सदलगानजीक असणाऱ्या ओढ्यावरील पुलाला जोडणाऱ्या रस्त्यावरील भराव वाहून गेला आहे. कुरुंदवाड-चिकोडी या आंतरराज्य रस्त्यावरील दानवाड येथील पुलाला जोडणारा रस्ता खचला आहे. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून, वाहनधारकांना जीव मुठीत धरूनच वाहन चालवावे लागत आहे.

०१सदलगा

फोटो- सदलगा-बोरगाव रस्त्यावरील पुलाजवळ वाहून गेलेला रस्ता.

Web Title: The floods have washed away the roads connecting the border areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.