पुरामुळे सात व्यक्ती व २७ जनावरांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:22 AM2021-07-25T04:22:09+5:302021-07-25T04:22:09+5:30
जिल्हा परिषदेत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या ५४.५ ...
जिल्हा परिषदेत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या ५४.५ फुटावर असून, संथ गतीने पाणी ओसरत आहे. जिल्ह्यात एनडीआरएफच्या ६ तुकड्या दाखल झाल्या असून, बचाव कार्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भारतीय लष्कर दलाची ७० जवानांची एक तुकडी शिरोळ परिसरातील मदत कार्यासाठी दाखल झाली आहे.
बाधित कुटुंबांना गहू, तांदूळ व तूर डाळ मोफत देण्यात येणार आहे.
सध्या राष्ट्रीय महामार्ग एनएच ४, २५ पैकी १७ राज्य मार्ग पाण्याखाली असल्याने बंद आहेत, तर १५ पुलांवर पाणी आले आहे. जिल्ह्यात ११२ जिल्हा मार्ग असून, त्यापैकी ५५ मार्ग व ३२ पूल पाण्याखाली गेल्याने बंद आहेत. पूर ओसरल्यानंतर रोगराई पसरु नये म्हणून स्वच्छता व आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
---
पाणी पुरवठाही ठप्प
पुरामुळे ३९९ नळ पाणी पुरवठा केंद्रे बंद असून, तीन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. येत्या २४ तासांत ३८ केंद्रे तर ४८ तासांत ८२ केंद्रे सुरू होतील. पुढील पाच दिवसात उर्वरित २९६ केंद्रे सुरू करण्याचे नियोजन केले आहे.
----
महावितरणची १० उपकेंद्रे बंद
महापुरामुळे महावितरणची जिल्ह्यातील १० उपकेंद्रे व ७५ हजार वीज वाहिन्या बंद आहेत. याचा १११ गावांना पूर्ण फटका बसला आहे, तर ३४ गावे अंशत: बाधित झाली आहेत. यामुळे १ लाख १२ हजार ९६१ ग्राहकांच्या वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
---
नातेवाइकांकडे स्थलांतरीत : ६७ हजार १११
निवारा कक्षेत : ८ हजार ९१५
कोविड रुग्ण- छावणीमध्ये स्थलांतरीत :- ४२
स्थलांतरीत जनावरे- २५ हजार ५७३
पूरबाधित गावे: ३६६
जनावरांचा मृत्यू : २७
---
धरणक्षेत्रातील पाऊस(मीमी) आजपर्यंत : गतवर्षी (२०२०),
राधानगरी : २६०० : १९००
तुळशी- २८४४ : १०९८
कासारी- २७१७ : १७९७
कुंभी- ४३५२ : ३५९७
कोल्हापूर: ९४३ : ४२७
----
दिव्यांगांना अनुदान
जिल्ह्यातील दिव्यांगांना प्रत्येक व्यक्तीला ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील २४ हजार लाभार्थ्यांना १ कोटी २१ लाख २१ हजार रुपये जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत वाटप करण्यात येणार आहेत.
---
गर्भवतींची काळजी
या दोन दिवसात जिल्ह्यातील पूरबाधित गावांतील ९० गर्भवती महिलांचे सुरक्षित स्थलांतर करून त्यांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. यापैकी ४ महिलांची यशस्वी प्रसूती झाली आहे.
----