Ganpati Festival -कोल्हापूर बाजारपेठेमध्ये फुलांचे दर चांगलेच कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 06:04 PM2020-08-21T18:04:30+5:302020-08-21T18:07:15+5:30

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर बाजारपेठेमध्ये फुलांचे दर चांगलेच कडाडले आहेत. झेंडू २००, तर निशिगंधाचा दर ६०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. प्रत्येक वर्षी या दरांत वाढ होते; पण यंंदा जवळपास दुप्पट वाढ झाल्याने फुलांची विक्री करायची कशी? असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर आहे.

Flower prices have gone up, marigold at Rs 200 and tuberose at Rs 600 per kg | Ganpati Festival -कोल्हापूर बाजारपेठेमध्ये फुलांचे दर चांगलेच कडाडले

Ganpati Festival -कोल्हापूर बाजारपेठेमध्ये फुलांचे दर चांगलेच कडाडले

Next
ठळक मुद्देगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांचे दर कडाडलेझेंडू २०० रुपये, तर निशिगंध ६०० रुपये किलो

कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर बाजारपेठेमध्ये फुलांचे दर चांगलेच कडाडले आहेत. झेंडू २००, तर निशिगंधाचा दर ६०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. 

श्रावण महिन्यात आवक कमी असली तरी मागणीही कमी होती, त्यामुळे फारशी दरवाढ झाली नाही. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांची मागणी वाढू लागली आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसत असून दरात मोठी वाढ झाली आहे.

झेंडू २००, गलाटा २००, शेवंती २२५, निशिगंध ६०० रुपये किलो झाल्याने किरकोळ बाजारात विक्री करायची कशी? असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर आहे. गुलाबाच्या दरातही वाढ झाली असून घाऊक बाजारात १० फुलांची पेंढी ४० रुपयांना झाली आहे.

 

Web Title: Flower prices have gone up, marigold at Rs 200 and tuberose at Rs 600 per kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.