अकरावी प्रवेशासाठी २७ जूनपासून उडणार झुंबड

By Admin | Published: June 18, 2014 01:01 AM2014-06-18T01:01:24+5:302014-06-18T01:04:18+5:30

केंद्रीय प्रक्रिया : शनिवारपासून उद्बोधन वर्ग भरणार; सर्वांना प्रवेश मिळणार

Flying flags for eleven entrants from June 27 | अकरावी प्रवेशासाठी २७ जूनपासून उडणार झुंबड

अकरावी प्रवेशासाठी २७ जूनपासून उडणार झुंबड

googlenewsNext

कोल्हापूर : शहरातील ३२ कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया दहावीची गुणपत्रिका मिळाल्यानंतर दि. २७ जूनपासून सुरू होणार आहे. या प्रक्रियेबाबत विद्यार्थी, पालकांच्या उद्बोधनासाठीचे वर्ग शनिवार (दि. २१)पासून भरणार आहेत.
केंद्रीय प्रवेशप्रक्रियेबाबत उद्बोधन वर्ग घेण्यात येतील. त्याची सुरुवात शनिवारी (दि. २१) सकाळी साडेदहा वाजता राम गणेश गडकरी हॉल, दुपारी तीन वाजता कॉमर्स कॉलेजमध्ये होईल. रविवारी (दि. २२) सकाळी साडेदहा वाजता विवेकानंद कॉलेज, दुपारी तीन वाजता कमला कॉलेज, तर अर्ज संकलन व वितरण केंद्रांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सोमवारी (दि. २३) सकाळच्या सत्रात मुख्याध्यापक संघ, दुपारी महावीर कॉलेजमध्ये होणार आहे. ‘एमसीव्हीसी’अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडे अर्ज करण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांसाठी शिक्षण खात्याच्या ६६६.८िीि‘ङ्मस्र.ङ्म१ॅ या संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रियेची माहिती असणार आहे.

Web Title: Flying flags for eleven entrants from June 27

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.