विकासकामांना गती देण्यावर भर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:30 AM2019-04-09T00:30:22+5:302019-04-09T00:30:27+5:30

कोल्हापूर - राधानगरी 55 कि.मी. भारत चव्हाण । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मोदी सरकारने पाच वर्षांत अनेक घोषणा ...

Focus on accelerating development work | विकासकामांना गती देण्यावर भर द्यावा

विकासकामांना गती देण्यावर भर द्यावा

Next

कोल्हापूर - राधानगरी
55 कि.मी.
भारत चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मोदी सरकारने पाच वर्षांत अनेक घोषणा केल्या आहे. त्यातील काहींची पूर्तता होत आहे. अजून बऱ्याच घोषणांची पूर्तता व्हायची आहे. त्याकरिता आणखी पाच वर्षे तरी या सरकारला संधी दिली पाहिजे, अशी स्पष्ट मतं कोल्हापूर -राधानगरी रस्त्यावर धावणाऱ्या एस. टी. बसमधील प्रवाशांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीजवळ मांडली. गत १५ वर्षांत जे जमले नाही ते पाच वर्षांत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा करणेदेखील चुकीचे असल्याचे अनेकांनी ठासून सांगितले.
महिला मतदारांशी संवाद साधला असता, मतदान करणारच असा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला. कोणत्या पक्षाला करायचे हे त्या दिवशीच ठरविणार असल्याचे कुर्डूच्या सावित्रीबाई पाटील यांनी सांगितले. राशिवडे येथील शेतकरी महिपती पाटील यांनी देशात विकास होत असल्याचे चित्र आहे. विकासासाठी पैसा दिला जात आहे; त्यामुळे रस्त्याची कामे होत आहेत, असे सांगितले. गुडाळचे दत्तात्रय पाटील यांनी केंद्र सरकारकडून विकासाला गती देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. कर्जमाफी दिल्यामुळे शेतकऱ्यांत समाधान असल्याचेही पाटील म्हणाले. राशिवडे येथील बाळू चांदणे यांनी मोदी सरकारच्या काळात खेडोपाडी रस्ते होत असल्याचे सांगत युवकांना रोजगाराच्या संधी वाढविल्या पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्तकेली.
प्रचाराला जोर नाही
ग्रामीण भागात प्रचाराचा जोर नसल्याचे दिसून आले. काही पुरुष प्रवासी मतदार निवडणुकीबाबत सजग झाले आहेत. महिला मतदारांपैकी अनेकांना उमेदवार कोण आहेत याचीही माहिती नाही.
निवडणुकीचा अद्याप उत्साह नसल्याचेही दिसून आले. सगळे राजकीय नेते एका माळेची मणी असल्याचे सांगत राजकारण्यांवर प्रवासी राग व्यक्तकरत होते.

Web Title: Focus on accelerating development work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.