गणेश मूर्ती विसर्जनासाठी फोल्डेबल वॉटर टँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:30 AM2021-09-07T04:30:36+5:302021-09-07T04:30:36+5:30
कोल्हापूर : येथील टीम गणेशा संस्थेतर्फे चार फुटाच्या आतील गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी फोल्डेबल वॉटर टँक तयार केला आहे. ...
कोल्हापूर : येथील टीम गणेशा संस्थेतर्फे चार फुटाच्या आतील गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी फोल्डेबल वॉटर टँक तयार केला आहे. त्याचे प्रात्यक्षिक सोमवारी न्यू पॅलेसच्या मागील बाजूस असलेल्या इंगवले मळ्यात संस्थेचे अध्यक्ष प्रशांत मंडलिक यांनी दाखवले.
मंडलिक म्हणाले, गणेश मूर्ती नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात विसर्जन केल्यास पाणी प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे गणेश मंडळांनी प्रतिष्ठापना केलेल्या आणि घरगुती गणपती विसर्जनासाठी फोल्डेबल वॉटर टँक बनवण्यात आला आहे. अशा ५०० लिटरच्या टँकमध्ये चार फूट उंचीचा एक, साडेसातशे लिटरच्या टँकमध्ये दोन, एक हजार लिटरच्या टँकमध्ये तीन गणपती विसर्जन करता येतात. विसर्जन केलेल्या मूर्तीचे विघटन अमोनियम बाय कार्बोनेटचा वापर करून करता येते. बाजारात मिळणारी पाण्याची टाकी खरेदी करूनही अशाप्रकारे टँक बनवता येत असल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो :०६०९२०२१-कोल- फोल्डेबल टँक
कोल्हापुरातील न्यू पॅलेसच्या मागील बाजूस असलेल्या इंगवले मळ्यात सोमवारी टीम गणेशा संस्थेतर्फे चार फुटाच्या आतील गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठीचा फोल्डेबल वॉटर टँकचे प्रात्यक्षिक प्रशांत मंडलिक यांनी दाखवले.