‘शालिनी’ची जागा स्टुडिओसाठीच शासनाकडे पाठपुरावा : आयुक्तांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 06:10 PM2018-10-17T18:10:42+5:302018-10-17T18:11:51+5:30

चित्रपट व्यावसायिकांची मागणी आणि कोल्हापूरकरांच्या भावनांचा विचार करून शालिनी सिनेटोनची जागा ही स्टुडिओसाठीच राहील यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत

 Follow Sholini's place for the studio to the government: clarification of the Commissioner | ‘शालिनी’ची जागा स्टुडिओसाठीच शासनाकडे पाठपुरावा : आयुक्तांचे स्पष्टीकरण

‘शालिनी’ची जागा स्टुडिओसाठीच शासनाकडे पाठपुरावा : आयुक्तांचे स्पष्टीकरण

Next
ठळक मुद्देत्या जागेवर बांधकाम परवानगी देऊ नका, अशी मागणी शेटे यांनी यावेळी केली.

कोल्हापूर : चित्रपट व्यावसायिकांची मागणी आणि कोल्हापूरकरांच्या भावनांचा विचार करून शालिनी सिनेटोनची जागा ही स्टुडिओसाठीच राहील यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत, अशी ग्वाही आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी महानगरपालिकेच्या सभेत दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर शोभा बोंद्रे होत्या.

शहरातील रि. स. नं. ११०४ पैकी भूखंड क्रमांक ५ व भूखंड क्रमांक ६ हे शालिनी सिनेटोन या वापरासाठीच आरक्षित करण्यास तसेच या ठिकाणी कोणत्याही बांधकामास परवानगी देण्यात येऊ नये, असा सदस्य
ठराव सभेत मंजूर करण्यात आला. तत्पूर्वी, या विषयावर चर्चा करताना भूपाल शेटे यांनी ‘शालिनी स्टडिओच्या जागेबाबत प्रशासनाने फेरप्रस्ताव सादर करा,’ अशा सूचना महापौरांनी दिल्या होत्या, तो का सादर केला नाही, अशी विचारणा भूपाल शेटे यांनी केली.

संबंधित बांधकाम व्यावसायिकाचे अंतिम रेखांकन रद्द केलेले नाही, याकडे लक्ष वेधतानाच पूर्वीचे सहायक संचालक धनंजय खोत यांनी संगनमत केले, त्याकडे आयुक्तांनी दुुर्लक्ष केले, असा आक्षेपही शेटे यांनी नोंदविला. स्टुडिओचे अस्तित्व कायम ठेवा, त्या जागेवर बांधकाम परवानगी देऊ नका, अशी मागणी शेटे यांनी यावेळी केली.

त्यावर आयुक्त चौधरी यांनी सविस्तर खुलासा केला. ती जागा स्टुडिओसाठीच राखीव ठेवावी, त्याचा वापरदेखील स्टुडिओसाठीच व्हावा अशी प्रशासनाची भूमिका आहे.हेरिटेज यादीत या जागेचा समावेश करावा याकरिता शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. जुनीइमारत पाडली त्याबद्दल संबंधितांवर ‘एफआयआर’देखील दाखल
केला आहे. ही जागा स्टुडिओसाठीच राखीव राहील यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले.

सभेत मंजूर झालेले अन्य विषय
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा.
कॉ. गोविंद पानसरे यांच्या स्मारकास अतिरिक्त जागा देण्यात यावी.
निल क्रांती योजनेअंतर्गत फिश मार्केट बांधण्याचा प्रस्ताव.
खोलखंडोबा देवस्थानचा विकास करण्याकरिता निधी मंजूर करावा.

Web Title:  Follow Sholini's place for the studio to the government: clarification of the Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.