वाहतूक नियमांचे पालन करा, अपघात कमी होतील : कादंबरी बलकवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 11:48 AM2021-02-18T11:48:16+5:302021-02-18T11:49:50+5:30

traffic police Kolhapur- प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात कमी होईल, त्यासाठी प्रत्येकानेच प्रबोधनात्मक पाऊलही उचलावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी केले.

Follow traffic rules, accidents will be less: Novelty bullying | वाहतूक नियमांचे पालन करा, अपघात कमी होतील : कादंबरी बलकवडे

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या सांगता समारंभात परिवहन विभागातील विनाअपघाताबद्दल चालकाचा सत्कार करण्यात आला. यावेळी महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देवाहतूक नियमांचे पालन करा, अपघात कमी होतील : कादंबरी बलकवडे राष्ट्रीय सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभ

कोल्हापूर : प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात कमी होईल, त्यासाठी प्रत्येकानेच प्रबोधनात्मक पाऊलही उचलावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी केले.

३२ व्या राष्ट्रीय सुरक्षा अभियानाअंतर्गत दि. १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत सडक सुरक्षा जीवन रक्षा या ब्रिद वाक्याप्रमाणे अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या समारोपप्रसंगी प्रशासक बलकवडे या प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करत होत्या. हा कार्यक्रम ताराबाई पार्कमधील धैर्यप्रसाद मंगल कार्यालयात बुधवारी झाला.

कार्यक्रमास पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, गृह पोलीस उपअधीक्षक सुनीता नाशिककर, करवीर पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, काटकर आदी प्रमुख उपस्थित होते.

प्रारंभी दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. यावेळी वाहतुकीचे नियम, हेल्मेट वापराचे फायदे आदीबाबत प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. युवापिढी, विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी शास्त्रोक्त पध्दतीने वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेऊनच वाहने चालवावीत, नियमांचे पालन करावे, याबाबत मौलिक मार्गदर्शन केले.

अभियानांतर्गत रस्ता सुरक्षासंदर्भात आयोजित शालेय मुला-मुलींच्या वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला, निबंध, घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस दलातील वाहनचालक, शहर वाहतूक शाखेतील उत्कृष्ट वाहतूक नियमन करणारे अंमलदार, एस. टी. विभाग, के.एम.टी., सार्वजनिक बांधकाम विभागाकडील विनाअपघात वाहन चालविणाऱ्या चालकांचा सत्कार करण्यात आला.

प्रस्ताविक अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी केले. शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी स्वागत व आभार मानले. यावेळी पोलीस, विद्यार्थी, आरएसपी, संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 

Web Title: Follow traffic rules, accidents will be less: Novelty bullying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.