कोल्हापूर -रत्नागिरी महामार्गावर निपाणीची पादचारी महिला ठार
By admin | Published: March 30, 2017 02:41 PM2017-03-30T14:41:21+5:302017-03-30T14:41:21+5:30
केर्ली येथे अपघात ; दुचाकीस्वारही जखमी
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : कोल्हापूर -रत्नागिरी राज्यमहामार्गावर दूचाकीच्या धडकेत निपाणीतील महिला ठार झाली, तर दूचाकीस्वार जखमी झाला. हा अपघात केर्ली (ता. करवीर) येथे गुरुवारी सकाळी घडला. जयश्री जगन्नाथ मराठे (वय ६०, रा. जत्राटवेश, निपाणी, ता. निपाणी, जि. बेळगांव ) असे मृताचे आहे.
जखमी दुचाकीस्वार विनायक मनोहर वाडकर (वय २० रा. गजानन महाराज नगर, संभाजीनगर, कोल्हापूर) यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत. याची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.
याबाबत पोलिस व नातेवाईकांनी सांगितले की, निपाणी येथील जयश्री मराठे या दोन दिवसांपुर्वी या केर्ली येथे आपली मुलगी रेखा गोविंद शिंदे यांच्याकडे यात्रेनिमित्त आल्या होत्या. गुरुवारी सकाळी त्या कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमहामार्गावरुन पायी फिरत असताना कोल्हापूरहून वाघबीळकडे जाणाऱ्या दूचाकीने जयश्री मराठे यांना जोराची धडक दिली.
या धडकेत त्या गंभीररित्या जखमी झाल्या तर दूचाकीस्वार विनायक वाडकर हाही जखमी झाला. या अपघातानंतर जखमींना १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेमधून सीपीआरमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. उपचार सुरु असताना जयश्री मराठे यांचा मृत्यु झाला. जखमी विनायक वाडकरवर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत. या अपघातात एक तरुणी किरकोळ जखमी झाली. मृत जयश्री मराठे यांच्या पश्चात पती, सात मुली, एक मुलगा असा परिवार आहे.