Football : मुलांत ‘डी. सी. नरके विद्यानिकेतन’ ची बाजी, मुलींत काडसिद्धेश्वर हायस्कूलचा वरचष्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 02:09 PM2018-08-01T14:09:10+5:302018-08-01T14:12:53+5:30
सतरा वर्षांखालील जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेत मुलांत डी. सी. नरके विद्यानिकेतनने विजया देवी यादव स्कूलचा, तर मुलींत काडसिद्धेश्वर हायस्कूलने देवाळे हायस्कूलचा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली.
कोल्हापूर : सतरा वर्षांखालील जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेत मुलांत डी. सी. नरके विद्यानिकेतनने विजया देवी यादव स्कूलचा, तर मुलींत काडसिद्धेश्वर हायस्कूलने देवाळे हायस्कूलचा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली.
विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यांत डी. सी. नरके विद्यानिकेतन (कुडित्रे) संघाने विजयादेवी यादव स्कूल (पेठवडगाव) चा १-० असा निसटता पराभव केला.
हा विजयी गोल डी. सी.कडून रणवीर गायकवाड याने नोंदवला. तत्पूर्वी पहिल्या उपांत्य सामन्यांत विजयादेवी यादव स्कूलने पन्हाळा पब्लिक स्कूलचा ३-२ असा टायब्रेकरवर पराभव करीत अंतिम फेरी गाठली, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यांत डी. सी. नरके विद्यानिकेतनने एकलव्य पब्लिक स्कूल(पन्हाळा) चा ४-३ असा टायब्रेकरवर पराभव करीत अंतिम फेरी गाठली.
मुलींच्या उपांत्य सामन्यात काडसिद्धेश्वर हायस्कूलने देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार हायस्कूलचा ३-० असा एकतर्फी पराभव केला. काडसिद्धेश्वरकडून सानिका चौगले हिने दोन, तर ऋतुजा पाटीलने एक गोलची नोंद केली. दुसºया उपांत्य सामन्यांत देवाळे हायस्कूलने किणी हायस्कूलचा ५-० असा एकतर्फी पराभव केला. देवाळेकडून कल्याणी पाटील हिने तीन, तर सानिका खडके हिने दोन गोलची नोंद केली.
मुलांचा विजयी संघ (डी. सी. नरके विद्यानिकेतन) - आदित्य पाटील, साहील खोत, संदीप आडनाईक, सनी कदम, इंद्रजित पाटील, रणवीर गायकवाड, सिद्धार्थ पाटील, वरद घाटगे, प्रभाकर पवार, प्रतीक पाटील, रोहित पाटील, शर्विल पाटील, ओंकार मेडसिंग, सौरभ वाकरेकर, प्रथमेश पाटील, आदित्य माने, सार्थक पोवार, यश दाभोळकर, प्रशिक्षक चेतन साळोखे, शिवाजी डुबल, सागर जाधव यांचा समावेश आहे.
काडसिद्धेश्वर हायस्कूल मुलींच्या विजयी संघात अर्पिता पोवार, सोनाली सुतार, सिमरन बावडेकर, शाहीन मुल्लाणी, निशा पाटील, पौर्णिमा साळे, श्रृतिका चौगले, ऋतुजा पाटील, साक्षी पाऊसकर, सानिका चौगले, स्वाती कानडे, सानिया पाटील, आरती काटकर, पुनम शिंदे, ऋतुजा लोहार, स्नेहल कांबळे, प्रशिक्षक अमित शिंत्रे, एस. जे. देवणे यांचा समावेश होता.