वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी वनविभाग करणार शेती, प्रायोगिक प्रकल्पासाठी पन्हाळ्याची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 01:55 PM2022-09-26T13:55:23+5:302022-09-26T13:55:54+5:30

मका, ऊस, नाचणा, भात या धान्याची वनहद्दीत शेती केली जाणार असून येणाऱ्या पिकावर जंगली प्राणी ताव मारणार

For the protection of wild animals, the forest department will do agriculture, Selection of Panhala Taluka for pilot project | वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी वनविभाग करणार शेती, प्रायोगिक प्रकल्पासाठी पन्हाळ्याची निवड

वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी वनविभाग करणार शेती, प्रायोगिक प्रकल्पासाठी पन्हाळ्याची निवड

googlenewsNext

नितीन भगवान

पन्हाळा: तालुक्यात वन्य प्राणी आणी मानव यांच्यातील संघर्षाची दरी मिटवण्यासाठी वनविभाग शेती करणार असून प्रायोगिक तत्त्वावर होणाऱ्या शेतीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा तालुक्याची निवड झाल्याने आता जंगली प्राणी मानवी वस्ती व मानवी शेती मध्ये येवून नुकसान करणार नाहीत. अशी माहिती परिक्षेत्र वनअधिकारी अनिल मोहीते यांनी दिली.

पन्हाळा तालुक्यात गेले पाच वर्षां पासून गव्यांचा वावर मोठ्या प्रमाणात होवू लागला आहे. गव्यांची पैदास पण मोठ्या प्रमाणात झाल्याने या जंगली जनावरांची मानवी वस्तीत व शेतीत हस्तक्षेप वाढला आहे. यातच बाजार भोगाव परीसरातील जंगल, शेतीत टस्कर येवुन गेल्याने तेथील शेतकरी गवे, टस्कर, वानरे, रानडुकरे व अन्य वन्य प्राण्यां पासून संरक्षण मिळावे म्हणून मोर्चे, आंदोलने करुन मागणी करत होते. याला वनविभागाने पर्याय काढला असून प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यात पहिल्यांदाच पन्हाळा तालुक्यात वनविभाग शेती करणार आहे.

मका, ऊस, नाचणा, भात या धान्याची वनहद्दीत शेती केली जाणार असून येणाऱ्या पिकावर जंगली प्राणी ताव मारणार आहेत. यामुळे मानवी वस्तीत व शेतीत हे प्राणी येणार नाहीत. त्याच बरोबर वनहाद्दीला सौरऊर्जा कुंपण, सागर गोटे व शिकेकाई कुंपण घालण्यात येणार आहे. तसेच जागोजागी वनतळी काढण्यात येणार आहेत. वनहद्दीतील पाणवठे दुरुस्त केले जाणार आहेत. गावातील शाळांच्या भिंती रंगवून प्रबोधन, सौरऊर्जेवर चालणाऱ्या विंधन विहिरी खोदण्यात येणार आहेत.

मानव आणी वन्य जिव संघर्षा बाबत होणाऱ्या नुकसानीची मिळणारी तुटपुंजी रक्कम आणी त्यातुन होणारे वाद व संघर्ष याला वनविभागाने पर्याय शेती करण्याचा चांगला काढला असला तरी याच्या यशस्वीते बाबत खुपच मोठी साशंकता निर्माण होणार आहे. तयार होणारी शेती लगेच होणार नाही यासाठी किमान पाच ते दहा वर्षाचा आराखडा असेल यासाठी येणारा निधी आणी होणारा खर्च याठिकाणीच ही साशंकता असेल.

'या' गावांचा समावेश

पन्हाळा शहरा जवळच्या आवळी, जेउर, बोरवडे, राक्षी, धबधबेवाडी, गिरोली, कुशीरे, पोर्ले, कोतोली, बांदीवडे, करंजफेण, कणेरी, उतरे आदी गावे समाविष्ट केली आहेत. तर बाजार भोगावं, काळजवडे, कोलीक - पडसाळी या अंतर्गत मधील गावांचा समावेश केला आहे.

Web Title: For the protection of wild animals, the forest department will do agriculture, Selection of Panhala Taluka for pilot project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.