रस्त्यावर आल्यास सक्तीने ॲन्टीजेन चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 07:42 PM2021-04-16T19:42:33+5:302021-04-16T19:44:18+5:30

CoronaVirus Kolhapur : कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी असताना अत्यावश्यक कामाच्या नावाखाली रस्त्यावर आल्यास संबंधित व्यक्तीची आज, शनिवारपासून मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तशा सुचना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिल्या.

Forced antigen testing if on the road | रस्त्यावर आल्यास सक्तीने ॲन्टीजेन चाचणी

रस्त्यावर आल्यास सक्तीने ॲन्टीजेन चाचणी

Next
ठळक मुद्देरस्त्यावर आल्यास सक्तीने ॲन्टीजेन चाचणी पॉझिटिव्ह आढळला तर थेट विलगीकरण कक्षात

कोल्हापूर : कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी असताना अत्यावश्यक कामाच्या नावाखाली रस्त्यावर आल्यास संबंधित व्यक्तीची आज, शनिवारपासून मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तशा सुचना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिल्या.

राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यातही संचारबंदी लागू आहे. अत्यावश्यक कामाचे नावाखाली नागरीक बाहेर पडून गर्दी करत आहेत. दुकान, बँक, भाजी मार्केट येथे नागरीकांची जास्त गर्दी होत आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शुक्रवारी शहरात फिरती करताना सर्वत्र गर्दी असल्याचे दिसून आले. त्यांच्या समवेत अतिरीक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे होते.

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गैरफायदा घेतला जात आहे. संचारबंदी असूनही होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव व धोका अधिकच वाढला आहे. शहरात मोबाईल व्हॅनच्या पथकाद्वारे रॅपिड ॲन्टीजन (कोवीड) चाचणी करण्याबाबत नियोजन करण्याच्या सुचना बलकवडे यांनी उप-आयुक्त निखिल मोरे यांना दिल्या.

महापालिकेच्या या पथकाद्वारे शहरातील ज्या ज्या ठिकाणी गर्दी होईल त्या ठिकाणी जागेवरच आज, शनिवारपासून कोवीड चाचणी करण्यात येणार आहे. संबंधित व्यक्ती पॉझिटीव्ह आढळल्यास त्यांना तात्काळ विलगीकरण कक्षात पाठविण्यात येणार आहे.

दसरा चौकातील कॅनरा बँक येथे गर्दी असल्याचे निदर्शनास आले. बँकेच्या दारामध्ये नागरीकांची गर्दी झाल्यामुळे प्रशासक बलकवडे यांनी आपली गाडी थांबवून बँक मॅनेजर यांना बोलावून घेतले. यावेळी या बँकेमध्ये नागरीकांमध्ये सोशल डिस्टंन्स नसलेचे मॅनेजरांना निदर्शनास आणून दिले. तसेच बँकेमध्ये मास्कचा वापर, सोशल डिस्टंन्स व सॅनिटाईजरचा वापर होणे आवश्यक असलेबाबतच्या सुचना दिल्या.
 

Web Title: Forced antigen testing if on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.