सात-बारा कोरा करण्यास भाग पाडू : समरजित घाटगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 02:27 PM2020-02-21T14:27:52+5:302020-02-21T14:29:53+5:30

विधानसभेच्या अधिवेशनात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्यासाठी सरकारला भाग पाडू, असा इशारा भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी दिला.

Forced to do seven-twelve squares: Samarjit Ghatge | सात-बारा कोरा करण्यास भाग पाडू : समरजित घाटगे

सात-बारा कोरा करण्यास भाग पाडू : समरजित घाटगे

googlenewsNext
ठळक मुद्देसात-बारा कोरा करण्यास भाग पाडू : समरजित घाटगे राज्यपालांना ५0 हजारांहून अधिक पत्रे

कोल्हापूर : विधानसभेच्या अधिवेशनात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्यासाठी सरकारला भाग पाडू, असा इशारा भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी दिला.

घाटगे यांनी गुरुवारी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. संपादक वसंत भोसले आणि वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. घाटगे म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्र्रकांत पाटील यांनी जाणीवपूर्वक जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र राहण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे. त्यामुळेच यापुढच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात भाजप सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणार आहे.

भाजपतर्फे आम्ही शेतकऱ्यांना राज्यपालांना पत्रे लिहण्याबाबत आवाहन के ले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राज्यपालांना आम्ही ५0 हजार शेतकऱ्यांची पत्रे पाठविणार आहोत.

या सगळ्याच्या जोरावर येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी आम्ही सात-बारा कोरा करण्यासाठी सरकारला भाग पाडू. साखर उद्योगामध्ये नवीन काही तरी करण्याची गरज आहे. त्यानुसार काही राज्यांचा मी दौरा करून आलो. त्याचे फायदे पाहता सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे घाटगे यांनी सांगितले.

नव्या, जुन्यांचा समन्वय

भाजपच्या तालुकाध्यक्षांच्या निवडी झाल्या, मात्र, कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी थांबलो आहे. जुन्या, नव्या कार्यकर्त्यांशी चर्चा करा आणि मगच पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणाºयांचा कार्यकारिणीमध्ये समावेश करा, अशा सूचना दिल्याचे घाटगे यांनी सांगितले.
 

 

Web Title: Forced to do seven-twelve squares: Samarjit Ghatge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.