ड्रेसकोड सक्ती स्थगित करा, रिक्षा संघटनांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 06:33 PM2020-06-04T18:33:58+5:302020-06-04T18:36:19+5:30
कोल्हापूर : रिक्षा चालकांची ड्रेसकोड सक्ती स्थगित करावी, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र रिक्षा चालक सेना, महाराष्ट्र वाहतूक सेना, भाजपा ...
कोल्हापूर : रिक्षा चालकांची ड्रेसकोड सक्ती स्थगित करावी, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र रिक्षा चालक सेना, महाराष्ट्र वाहतूक सेना, भाजपा रिक्षा आघाडीच्यावतीने शहर वाहतूक नियंत्रण शाखाचे पोलिस निरिक्षक वसंत बाबर यांना दिले.
यानिवेदना म्हटले आहे की, काही रिक्षा चालकांच्या चुकींमुळे कोल्हापुरातील रिक्षा व्यवसाय बदनाम होण्याच्या मार्गावर होता. अशा गैरवर्तन करणाय्रा रिक्षा चालकांना चाप बसण्यासाठी ड्रेसकोड सक्तीचा केला. या निर्णयाचा सर्वच क्षेत्रात स्वागत झाले.
सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दिवसभर काम केल्यानंतर सायंकाळी घरी गेल्यावर कपडे धुण्यास टाकवी लागत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत ड्रेस कोड सक्तीला स्थगिती मिळावी. यावेळी रिक्षा चालक संघटनेचे राजेंद्र जाधव, चंद्रकांत भोसले, विजय गायकवाड, वसंत पाटील उपस्थित होते.