विदेशीना व्हाट्स अप ग्रुपमध्ये समाविष्ट करणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 06:27 PM2018-08-24T18:27:36+5:302018-08-24T18:33:03+5:30
व्हाट्स अप ग्रुप तयार करून त्यात देशविरोधी संदेश पाठवून दोन गटात तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून ग्रुप अडमीनला बेळगावात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अक्षय राजेंद्र अल्गोडीकर वय 20 रा. महावीरनगर उद्यमबाग असे या ग्रुप अडमीनचे नाव आहे.
बेळगाव : व्हाट्स अप ग्रुप तयार करून त्यात देशविरोधी संदेश पाठवून दोन गटात तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून ग्रुप अडमीनला बेळगावात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अक्षय राजेंद्र अल्गोडीकर वय 20 रा. महावीरनगर उद्यमबाग असे या ग्रुप अडमीनचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय याने एक व्हाट्स अप ग्रुप तयार केला होता, त्या ग्रुपला स्टार ग्रुप असे नाव देऊन ग्रुप मध्ये शेजारील देशाच्या सदस्यांना समाविष्ट केले होते. त्या विदेशी सदस्यांनी दोन धर्मियांत तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकली.
त्या विदेशी सदस्यांनी ग्रुप सोडला, मात्र ग्रुप अडमीन असणाऱ्या अक्षयने ग्रुपवर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. याहून उलट देशविरोधी पोस्ट टाकणाऱ्या त्या विदेशीना पुन्हा ग्रुप मध्ये समाविष्ट केले.
ग्रुप अडमीनने दोन गटात तेढ निर्माण करणाऱ्या सदस्यांना काढून टाकणे गरजेचे होते, खुलासा देणे गरजेचे असते, मात्र अक्षयने तसे न करता त्या देश विरोधी पोस्ट टाकणाऱ्याना पुन्हा समाविष्ट केले म्हणून त्याला अटक करण्यात आली आहे. उद्यमबाग पोलिसांनी स्वतः होऊन अक्षयवर गुन्हा दाखल केला आहे.