डोंगराळ गायरानात जवानाने फुलवला वनराईचा मळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:28 AM2021-09-07T04:28:50+5:302021-09-07T04:28:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क. बांबवडे : डोंगराळ, खडकाळ गायरानात जिथे वनस्पतीसुद्धा उगवू शकत नाहीत, अशा ठिकाणी पाण्याचे विकत टँकर नेऊन ...
लोकमत न्यूज नेटवर्क.
बांबवडे : डोंगराळ, खडकाळ गायरानात जिथे वनस्पतीसुद्धा उगवू शकत नाहीत, अशा ठिकाणी पाण्याचे विकत टँकर नेऊन ३४ एकर जागेत वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करण्याचा विडा उचललेल्या जवानाला सामाजिक व शासकीय मदतीची गरज हवी आहे.
पिशवी (ता. शाहूवाडी) येथील जालिंदर इंगवले माजी सैनिकाने ३४ एकर गायरानात वृक्षलागवड ,ऑक्सिजन पार्क उभारण्याचा विडा उचलला व २०१६ ला भैरवनाथ पर्यावरण नावाची संस्था स्थापन करत वृक्ष लागवडीस सुरुवात केली. परंतु या गायनात वृक्षारोपण करणे, काही लोकांना रुचत नव्हते त्यांनी येथे नासधूस करायला सुरुवात केली. यावर संस्थेमार्फत ग्रामपंचायतीकडे रीतसर वृक्षारोपणाची परवानगी मागितली, ग्रामपंचायतीने ठराव करून वृक्षारोपण परवानगी देत आहे असा ठराव करण्यात आला. आणि या जागेवर मालकी ही ग्रामपंचायत व प्रशासनाचीच आहे तशी कायम राहील, असे असतानाही, काही लोक जाणून-बुजून नासधूस करतात.या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या मंडळांना, आर्थिक मदत करणाऱ्यांना दबाव आणणे धमक्या देणे हे सुरू असते. पुढे इंगवले यांनी स्वतः पुढाकार घेऊन२०१८ला झाड फाउंडेशन नावाची संस्था उभारली,संस्थेमार्फत काम जोमाने सुरु केले,पदरमोड करणे,दानशूरांची मदत घेणे. असे करत सत्तावीस एकरात वृक्षारोपण, ऑक्सिजन पार्क इत्यादी यशस्वी प्रयोग केला. परंतु काही समाजकंटकांनी दोन वेळ वनवा लावण्याचे काम केले.
परंतु भारतीय सैन्यातून निवृत्त झालेला जवान न डगमगता पत्नी प्रियांकाच्या साथीने पुन्हा जोमाने कामास सुरुवात करतो. शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देणे, त्यांची मदत घेणे, त्यामध्येही अधिकारी अनास्था दाखवतात त्यांच्यावर उपोषणाचे हत्यार उपसणे व काहीही करून पर्यावरणाचे रक्षण करणारा हा अवलिया असून त्यांना मदतीचा हात सर्वांनी देणे गरजेचे आहे.