गुळंब येथे वनविभागातर्फे १०० महिलांना गॅस वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:24 AM2021-03-25T04:24:02+5:302021-03-25T04:24:02+5:30

पाटणे वनपरिक्षेत्रांतर्गत संयुक्त वनव्यवस्थापन समिती गुळंब यांच्यातर्फे जिल्हा वार्षिक नियोजन समिती अंतर्गत १०० महिला कुटुंबप्रमुखांना स्वयंपाक गॅसचे वितरण आमदार ...

Forest department distributes gas to 100 women at Gulamb | गुळंब येथे वनविभागातर्फे १०० महिलांना गॅस वाटप

गुळंब येथे वनविभागातर्फे १०० महिलांना गॅस वाटप

Next

पाटणे वनपरिक्षेत्रांतर्गत संयुक्त वनव्यवस्थापन समिती गुळंब यांच्यातर्फे जिल्हा वार्षिक नियोजन समिती अंतर्गत १०० महिला कुटुंबप्रमुखांना स्वयंपाक गॅसचे वितरण आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

आमदार पाटील यांनी गॅस वापराबाबत काळजी घेण्याच्या सूचना केल्या. प्र.वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी वनसंरक्षणात वनविभागास सहकार्य करण्याची विनंती केली.

यावेळी वनसमिती अध्यक्ष भिकाजी गोंडे, वनसमिती कोदाळी अध्यक्ष अंकुश गावडे, सचिव तथा वनपाल कळसगादे बी. आर. भांडकोळी, वनरक्षक एम. एस. खोत, जी. पी. वळवी, वनसेवक तुकाराम गुरव, मोहन तुपारे, विश्वनाथ नार्वेकर, अशोक कदम यांच्यासह ग्रा. पं. सदस्य, सेवासंस्था, पदाधिकारी, ग्रामस्थ व कांचन गौरी, सचिन मुळीक उपस्थित होते.

* फोटो ओळी : गुळंब (ता. चंदगड) येथे महिला कुटुंबप्रमुखांना स्वयंपाक गॅसचे वितरण आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते झाले.

क्रमांक : २४०३२०२१-गड-०५

Web Title: Forest department distributes gas to 100 women at Gulamb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.