कासारवाडीतील गायरानची १२२ हेक्टर जागा वनविभागाच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:17 AM2021-07-16T04:17:04+5:302021-07-16T04:17:04+5:30

मौजे कासारवाडी येथील गायरान गट क्र. ६३०/१/अ जमिनीचा ताबा देण्याबाबत हातकणंगले तहसील कार्यालयाने करवीर वनपरिक्षेत्र विभागाला ४ फेब्रुवारीला लेखी ...

Forest Department in possession of 122 hectare land of Gairan in Kasarwadi | कासारवाडीतील गायरानची १२२ हेक्टर जागा वनविभागाच्या ताब्यात

कासारवाडीतील गायरानची १२२ हेक्टर जागा वनविभागाच्या ताब्यात

Next

मौजे कासारवाडी येथील गायरान गट क्र. ६३०/१/अ जमिनीचा ताबा देण्याबाबत हातकणंगले तहसील कार्यालयाने करवीर वनपरिक्षेत्र विभागाला ४ फेब्रुवारीला लेखी कळवले होते. यानुसार महसूल व वनविभागाने संयुक्तपणे मोहीम राबवत जी.पी.एस मशीनद्वारा अंतिम पाहणी करून १२२ हेक्टर क्षेत्र वडगाव मंडल अधिकारी यांच्याकडून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.

६३०/१/अ मधील क्षेत्र हे भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २९ नुसार १९५३ मध्ये संरक्षित वन म्हणून अधिसूचित झाले होते तसेच सातबारावरही संरक्षित वन म्हणून नोंद आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात दगड व मुरूम उत्खनन सुरू असल्याने पर्यावरण व नैसर्गिक साधनसंपत्तीची हानी पोहोचत होती तसेच परिसरातील शेती,पाण्याच्या विहिरी व रहिवासी घरांना धोका निर्माण होत असल्याने कासारवाडी ग्रामपंचायतीने हरित लवादाकडे धाव घेतली होती. अखेर, महसूल विभागाकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात ताबा घेतला.

यावेळी वनक्षेत्रपाल एस. ए. केसरकर, धनपाल एस. एस. जाधव, मंडल अधिकारी गणेश बर्गे, तलाठी जयसिंग चौगुले, वनरक्षक आर. पी. नाईक, वनपाल विजय पाटील, वनमजूर पुंडलिक खाडे, एस. एस. हजारे, कासारवाडी सरपंच शोभाताई खोत, उपसरपंच साधना खाडे उपस्थित होतेेेे. वनविभागाच्या जागेत कोणतेही अतिक्रमण, अवैध उत्खनन, अवैध वाहतूक, अवैध वृक्षतोड करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा करवीर वनक्षेत्रपाल एस. ए. केसरकर यांनी दिला आहे.

कोट : ६३०/१अ हे क्षेत्र वनविभागाच्या ताब्यात आले असून याठिकाणी कोणतेही अतिक्रमण, अवैध उत्खनन, अवैध वाहतूक, अवैध वृक्षतोड करू नये अन्यथा भारतीय वन अधिनियम १९२७ व वनसंवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

(एस ए केसरकर -वनक्षेत्रपाल करवीर.)

फोटो ओळी :- कासारवाडी येथील गायरानाचा ताबा घेताना वनविभागाचे कर्मचारी.

Web Title: Forest Department in possession of 122 hectare land of Gairan in Kasarwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.