Kolhapur: विहिरीत पडलेल्या गव्याला वनविभागाने दिले जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 15:09 IST2025-01-31T15:07:18+5:302025-01-31T15:09:46+5:30

आजरा : आंबाडे ( ता. आजरा ) येथे १८ ते २० फूट कोरड्या विहिरीत पडलेल्या गव्याला वन विभागाच्या अधिकारी ...

Forest Department saves life of gaur that fell into well in Ajara Kolhapur | Kolhapur: विहिरीत पडलेल्या गव्याला वनविभागाने दिले जीवदान

Kolhapur: विहिरीत पडलेल्या गव्याला वनविभागाने दिले जीवदान

आजरा : आंबाडे ( ता. आजरा ) येथे १८ ते २० फूट कोरड्या विहिरीत पडलेल्या गव्याला वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवदान दिले आहे. विष्णू शिवनगेकर यांच्या शेतात मध्यरात्री गवा विहीरीत पडला होता.

कोरड्या विहिरीत गवा पडल्याची माहिती दुपारी ३ वा. वनविभागाला समजली. उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल मनोजकुमार कोळी, धनगरमोळा वनपाल भरत निकम, वनरक्षक संजय दुंडगे, दीपक कदम व घाटकरवाडी येथील वन्यजीव बचाव पथकाचे कर्मचारी यांनी पोकलॅनच्या साह्याने गव्याची विहिरीतून सुटका केली. 

ग्रामस्थ व ऊसतोड करण्यासाठी आलेल्या फडकऱ्यांनी गव्याला पाहण्यासाठी विहीरीच्या काठावर एकच गर्दी केली होती. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचताच त्यांनी कोणतीही दुर्घटना होऊ नये. म्हणून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सर्वांना हाकलून लावले. जवळपास साडेतीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीला चर खोदण्यात आली व त्या चरीमधूनच गव्याने थेट जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.

Web Title: Forest Department saves life of gaur that fell into well in Ajara Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.