टस्करने केलेल्या पीक नुकसानीची वनअधिकाऱ्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:23 AM2021-05-23T04:23:01+5:302021-05-23T04:23:01+5:30
: आजरा तालुक्यातील हाळोली, वेळवट्टी परिसरात हत्तींनी पिकांचे मोठे नुकसान केले आहे. आजऱ्याच्या परिक्षेत्र वनअधिकारी पदाचा पदभार स्वीकारलेल्या स्मिता ...
: आजरा तालुक्यातील हाळोली, वेळवट्टी परिसरात हत्तींनी पिकांचे मोठे नुकसान केले आहे. आजऱ्याच्या परिक्षेत्र वनअधिकारी पदाचा पदभार स्वीकारलेल्या स्मिता होगाडे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. हाळोली येथे हत्तींनी केलेल्या नुकसानीची पाहणी करून ग्रामस्थ व शेतकऱ्यांसोबत उपाययोजनाबाबत चर्चा केली.
हाळोली येथील संजय भिकाजी गुरव, लक्ष्मण गोविंद गुरव, पांडुरंग गोविंद गुरव, कृष्णा बंडोपंत बांदेकर, दशरथ आनंदा अमृते व कृष्णा गोपाळ गावडे यांच्या ऊसपिकांचे टस्कर हत्तींनी नुकसान केले आहे. मसोली येथील धनाजी तुकाराम कुंभार यांच्या नारळाच्या झाडासह एक एकरमधील उसाचे नुकसान हत्तींनी केले आहे. या संपूर्ण भागाची पाहणी परिक्षेत्र वनअधिकारी स्मिता होगाडे यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत तालुक्यातील वनपाल, वनरक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
देवर्डे येथील वनविभागाच्या काजूबागेला स्मिता होगाडे यांनी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी हाळोली, मसोली परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांसह वनपाल, वनरक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
२२ आजरा वनअधिकारी
फोटोकॅप्शन - टक्कर हत्तींकडून झालेल्या ऊसपिकांच्या नुकसानीची पाहणी करताना परिक्षेत्र वनअधिकारी स्मिता होगाडे. सोबत वनपाल, वनमजूर व कर्मचारी.