वनरक्षकाने लग्न केल्यानंतर पहिल्यांदा या कामाला प्राधान्य दिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 01:45 PM2020-05-04T13:45:19+5:302020-05-04T13:48:29+5:30
लग्नात खर्च होणारी रक्कम मुख्यमंत्री साहाय्यता निधीस देण्याचे ठरविले. त्यानुसार दोन मे रोजी विवाहाच्या मुहुर्तावरच त्यांनी स्वत:च्या नावे ५० हजार व वधू तेजस्विनी यांच्या नावे ५० हजार असे एकूण एक लाखांची रक्कम नेटबँकिंगद्वारे मुख्यमंत्री साहाय्यता निधीत जमा करून देशवासीयांसमोर नवा आदर्श निर्माण केला.
कोल्हापूर : चंद्रपूर येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक व मूळचे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कंंदूर गावचे रहिवासी असलेले राहुल पाटील व त्यांच्या भावी वधू तेजस्विनी साळुंखे यांनी आपल्या लग्नात होणाऱ्या खर्चाला फाटा देत एक लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री साहाय्यता निधीत शनिवारी (दि. २) नेटबँकिंग प्रणालीद्वारे बहाल केली.
भारतीय वनसेवेच्या चंद्रपूर येथील बांबू संशोधन केंद्राचे संचालक असलेले राहुल हे मूळचे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कंदूर गावचे रहिवासी आहेत. त्यांचे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील किंदळ गावच्या रहिवासी व सध्या मुंबई येथे इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करणाºया तेजस्विनी यांच्याशी विवाह जुळला होता. विवाहाची तारीख दोन मे होती. मात्र, त्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पाणी फिरले. त्यांनीही या संकटाच्या काळात लग्न सोहळा करायचा नाही.
लग्नात खर्च होणारी रक्कम मुख्यमंत्री साहाय्यता निधीस देण्याचे ठरविले. त्यानुसार दोन मे रोजी विवाहाच्या मुहुर्तावरच त्यांनी स्वत:च्या नावे ५० हजार व वधू तेजस्विनी यांच्या नावे ५० हजार असे एकूण एक लाखांची रक्कम नेटबँकिंगद्वारे मुख्यमंत्री साहाय्यता निधीत जमा करून देशवासीयांसमोर नवा आदर्श निर्माण केला. या दातृत्वाची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी टिष्ट्वटरच्या माध्यमातून उभयतांचे कौतुक केले आहे.