मुलांच्या प्रवेशाचे ‘टेन्शन’ विसरा...

By Admin | Published: March 25, 2015 11:56 PM2015-03-25T23:56:06+5:302015-03-26T00:04:57+5:30

‘लोकमत’मिशन अ‍ॅडमिशन प्रदर्शनाचा आज प्रारंभ : नर्सरी ते दहावीपर्यंतच्या शाळा, प्रवेशाची एकाच छताखाली माहिती

Forget children's admission 'tension' | मुलांच्या प्रवेशाचे ‘टेन्शन’ विसरा...

मुलांच्या प्रवेशाचे ‘टेन्शन’ विसरा...

googlenewsNext

कोल्हापूर : मार्चच्या अखेरीस मुलांच्या प्रवेशासाठी सोयीस्कर ठरणाऱ्या शाळांची माहिती घेण्यासाठी पालकांची धावपळ सुरू होते. त्यासाठी शाळांची शोधाशोध त्यांना करावी लागते. त्यावर पालकांची अशा स्वरूपातील धावपळ टळावी आणि त्यांचा वेळ, पैशांची बचत व्हावी या उद्देशाने ‘लोकमत’ने कोल्हापुरात ‘मिशन अ‍ॅडमिशन - समर कॅम्प एक्स्पो २०१५’ हे प्रदर्शन आयोजित केले आहे. आज, गुरुवारपासून तीन दिवस सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत कमला कॉलेजजवळच्या व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात हे प्रदर्शन होणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते, साई सर्व्हिस प्रा.लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धेश्वर कोकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. नर्सरीपासून दहावीपर्यंतच्या शाळा प्रवेशाची साद्यंत माहिती ‘मिशन अ‍ॅडमिशन’मध्ये एकाच छताखाली मिळणार आहे. पालकांना मुलांच्या शाळा प्रवेशाचे मोठे टेन्शन असते. यात त्यांना घरापासून जवळ असलेल्या आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळेचा शोध घेणे, त्या शाळेकडून पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, प्रवेश शुल्क किती आणि त्याची आकारणी कशी होते, व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने कोणते उपक्रम शाळा राबविते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवावी लागतात. त्यासाठी त्यांची धावपळ होते. पालकांची ही धावपळ ‘मिशन अ‍ॅडमिशन’मुळे थांबणार आहे. यात शाळांच्या सुविधा, शुल्क आणि विविध उपक्रमांची माहिती, अशा स्वरूपातील मुलांच्या प्रवेशाबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरे पालकांना एकाच छताखाली मिळणार आहेत. शाळांच्या प्रतिनिधींशी पालकांना प्रत्यक्षात चर्चा करता येणार आहे. शाळांनादेखील पालकांपर्यंत पोहोचण्याची संधी या प्रदर्शनाने उपलब्ध करून दिली आहे.
प्रवेशापासून ‘डाएट प्लॅनिंग’पर्यंत
या प्रदर्शनामध्ये शाळा, कोचिंग क्लासेस, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, अबॅकस, अ‍ॅनिमेशन इन्स्टिट्यूट, आर्ट अँड क्राफ्ट, करिअर मार्गदर्शन, सर्व प्रकारचे स्पोर्टस कोचिंग क्लासेस, नृत्य, चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, संगीत वाद्ये, स्मरणशक्ती, योगासन, व्यक्तिमत्त्व विकास, स्पोकन इंग्लिश कोर्सेस, बुद्ध्यांक मूल्यमापन मार्गदर्शन ते मुलांच्या आहाराबाबत ‘डाएट प्लॅनिंग,’ आदी स्वरूपातील माहिती मिळणार आहे. (प्रतिनिधी)

प्रदर्शनाची वैशिष्ट्ये
प्रदर्शनात कोल्हापुरातील नर्सरी ते दहावीपर्यंतच्या नामवंत शाळांचा सहभाग
माहिती मिळविण्यासह स्पर्धांतून आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी


कोल्हापुरात ‘लोकमत’ने शाळा प्रवेशाची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे ‘मिशन अ‍ॅडमिशन - समर कॅम्प एक्स्पो २०१५’ प्रदर्शन आयोजित केले आहे. त्याचा प्रारंभ गुरुवारी होणार आहे. त्यासाठी कमला कॉलेजजवळील व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात जय्यत तयारी करण्यात आली असून, प्रदर्शनातील स्टॉल सज्ज झाले आहेत.

बालविकास मंचतर्फे ‘ध... धमाल’ स्पर्धा
प्रदर्शनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘लोकमत बालविकास मंच’तर्फे ‘ध... धमाल’ स्पर्धा होणार आहेत. यात गुरुवारी दुपारी तीन वाजता निबंधलेखन स्पर्धा होईल. ‘माझी शाळा’ असा स्पर्धेचा विषय आहे. शुक्रवारी (दि. २७) दुपारी तीन वाजता ‘टॅलेंट हंट,’ शनिवारी (दि. २८) सायंकाळी ज्युनिअर अमिताभ बच्चन यांच्यासमवेत ‘कौन बनेगा स्मार्ट’ स्पर्धा होणार आहे. यातील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.

Web Title: Forget children's admission 'tension'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.