पूरग्रस्तांचा घरफाळा, पाणीपट्टी माफ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:27 AM2021-08-13T04:27:15+5:302021-08-13T04:27:15+5:30
निवेदनात म्हटले आहे की, पंचगंगेला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या भागात अनेक दिवस नागरिकांच्या घर, कारखाना व दुकानांमध्ये पाणी शिरले होते, ...
निवेदनात म्हटले आहे की, पंचगंगेला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या भागात अनेक दिवस नागरिकांच्या घर, कारखाना व दुकानांमध्ये पाणी शिरले होते, तसेच शहर व परिसरातील शेतकरी, व्यापारी, उद्योजक यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हजारो एकर शेती पाण्याखाली गेल्याने पिके नष्ट झाली आहेत. व्यापारी आणि उद्योजकांचेही खूप मोठे नुकसान झाले. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरश: मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे पूरग्रस्तांचा विचार करून त्वरित घरफाळा व पाणीपट्टी माफ करावी. शिष्टमंडळात संजय बेडक्याळे, अण्णासाहेब शहापुरे, बसगोंडा बिराजदार, गोवर्धन दबडे, निवृत्ती शिरगुरे यांचा समावेश होता.
चौकट :
पूरग्रस्त शेती भागातील वीजपुरवठा सुरू करा
महापुरामुळे पूरग्रस्त भागातील शेतीसाठीचा विद्युत पुरवठा बंद पडला आहे. अनेक भागांत विद्युत खांब कलले अथवा पडले आहेत. संपूर्ण खांब व तारांची पाहणी व दुरुस्ती करून विद्युत पुरवठा तत्काळ सुरू करावा, अशा मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महावितरण कार्यालयात दिले.