मुरगूडमधील पूरग्रस्तांचा घरफाळा,पाणीपट्टी माफ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:25 AM2021-07-31T04:25:42+5:302021-07-31T04:25:42+5:30
मुरगूड येथे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून शेती,घरे याद्वारे आर्थिक फटका ही बसला आहे. त्यामुळे सहानुभूतीपूर्वक विचार करून शहरातील ...
मुरगूड येथे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून शेती,घरे याद्वारे आर्थिक फटका ही बसला आहे. त्यामुळे सहानुभूतीपूर्वक विचार करून शहरातील नुकसानग्रस्तांचा घरफाळा आणि पाणीपट्टी पूर्णपणे माफ करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी,मुख्यमंत्री, पालकमंत्री,आमदार,खासदार यांना दिले आहे. मुरगूड शहरातील चौगले गल्ली, कुंभार गल्ली, विठ्ठल मंदिर परिसर, नाका नंबर एक परिसर व इतर भागात नदीचे पाणी घरामध्ये घुसून अनेक रहिवासी नागरिकांचे घरे पडली आहेत. अतिवृष्टी झाल्यामुळे घरामध्ये पाणी गेल्याने अपरिमित असे नुकसान झालेले आहे. अशा बाधित कुटुंबांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये घरफाळा भरणे पाणीपट्टी भरणे अडचणीचे आहे.
मुरगूड नगरपालिकेने यांचा विचार करून घरफाळा व पाणीपट्टी माफ करावी अशा मागणीचे निवेदन पालिका अधिकाऱ्यांना दिले आहे. कार्यालयीन प्रमुख शीतल पाटील, शहर अभियंता प्रकाश पोतदार यांनी निवेदन स्वीकारले. या निवेदनावर माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, राहुल वडकर, माजी नगराध्यक्ष नम्रता भांदीगरे, ॲड. सुधीर सावर्डेकर, नामदेव भांदीगरे,संजय मोरबाळे, शिवाजी सातवेकर,संपत कोळी, गणपती बारड ,राजू चव्हाण,बी. एम. मेडके बाळासो मेंडके, रणजित मुगदम आदींच्या सह्या आहेत.
३० मुरगूड निवेदन
फोटो ओळ :-
मुरगूडमधील पूरग्रस्त नागरिकांचा घरफाळा व पाणीपट्टी माफ करा या मागणीचे निवेदन देताना नामदेव भांदीगरे ॲड. सुधीर सावर्डेकर, संजय मोरबाळे, राहुल वडकर,संपत कोळी,राजेंद्र चव्हाण आदी