क्षमाधर्माने समाजात एकात्मता नांदेल : सुरेखा मोटके पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:42 AM2021-02-18T04:42:51+5:302021-02-18T04:42:51+5:30
येथील कुंभोजे मळा महावीर दिगंबर जैन मंदिरामध्ये वीर महिला मंडळ व वीर सेवादल यांच्या संयुक्त विद्यमाने दशलक्षण पर्वानिमित्त आयोजित ...
येथील कुंभोजे मळा महावीर दिगंबर जैन मंदिरामध्ये वीर महिला मंडळ व वीर सेवादल यांच्या संयुक्त विद्यमाने दशलक्षण पर्वानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत क्षमाधर्म या विषयावर मोटके पाटील बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सुचेता कलाजे होत्या. नमोकार मंत्राने कार्यक्रमाला सुरुवात झाली. स्वागत सुवर्णा कल्याणी यांनी केले. यावेळी वीर सेवा दलाचे जिल्हा संघटक सुरेश मालगावे, जैन मंदिर समितीचे अध्यक्ष सुरेश कुंभोजे, जिल्हा सूतगिरणीचे संचालक प्रकाश अकिवाटे यांच्यासह श्रावक उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्योती देसाई यांनी केले. सविता कुंभोजे यांनी आभार मानले. जिनवाणी स्तुतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
फोटो - १७०२२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळी - यड्राव (ता. शिरोळ) येथे कुंभोजे मळा जैन मंदिरामध्ये आयोजित व्याख्यानमालेत सुरेखा मोटके पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सुवर्णा कल्याणी, सुचेता कलाजे, सुरेश कुंभोजे, प्रकाश अकिवाटे, सुरेश मालगावे उपस्थित होते.(छाया - घन:शाम कुंभार)