'गोकुळ'च्या निवडणुकीची औपचारिकताच शिल्लक : मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 06:01 PM2021-04-29T18:01:29+5:302021-04-29T18:03:18+5:30

GokulMilk Kolhapur HasanMusrif : राजर्षी शाहू शेतकरी आघाडीवरील दूध उत्पादकांचा विश्वास आणि ठरावधारक सभासदांचा प्रचार दौऱ्यातील प्रतिसाद पाहता माझी खात्री झाली आहे की,आमची आघाडी प्रचंड मतांनी विजयी होईल, आमचे सर्वच म्हणजे २१ उमेदवार बाजी मारतील.त्यामुळे'गोकुळ'च्या निवडणुकीची केवळ औपचारिकताच शिल्लक राहिली आहे.आमचे डोळे आता चेअरमन निवडीकडे आहेत, असा विश्वास ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

The formality of the election of 'Gokul' remains | 'गोकुळ'च्या निवडणुकीची औपचारिकताच शिल्लक : मुश्रीफ

गडहिंग्लज येथे आयोजित गडहिंग्लज विभागातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले.

Next
ठळक मुद्दे'गोकुळ'च्या निवडणुकीची औपचारिकताच शिल्लक : मुश्रीफआमचे डोळे चेअरमन निवडीकडे, गडहिंग्लजला प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक

गडहिंग्लज : राजर्षी शाहू शेतकरी आघाडीवरील दूध उत्पादकांचा विश्वास आणि ठरावधारक सभासदांचा प्रचार दौऱ्यातील प्रतिसाद पाहता माझी खात्री झाली आहे की,आमची आघाडी प्रचंड मतांनी विजयी होईल, आमचे सर्वच म्हणजे २१ उमेदवार बाजी मारतील.त्यामुळे'गोकुळ'च्या निवडणुकीची केवळ औपचारिकताच शिल्लक राहिली आहे.आमचे डोळे आता चेअरमन निवडीकडे आहेत, असा विश्वास ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

येथील हॉटेल सूर्यामध्ये आयोजित चंदगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या निवडणूक नियोजनाच्या बैठकीत ते बोलत होते.
मुश्रीफ म्हणाले, गेली २० वर्षे ज्या पद्धतीने सत्ता राबवली गेली. त्याचा प्रचंड राग मतदारांमध्ये पदोपदी जाणवतो.म्हणूनच,गोकुळ दुध संघ मल्टीस्टेट करून घशात घालण्याचे कारस्थान सभासदांनी हाणून पाडले.

आमदार राजेश पाटील म्हणाले, गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तिन्ही तालुक्यांत आपल्या आघाडीची बाजू भक्कम आहे.विजयासाठी अहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपल्या आघाडीला मताधिक्य देण्याचा निर्धार केला आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील म्हणाले, मी स्वतःच उमेदवार आहे, असे समजून काम करत आहे. पक्ष व संघटना यास महत्त्व देणारा व नेत्यांचे आदेश मानणारा मी सच्चा व लढवय्या कार्यकर्ता आहे. मी या निवडणुकीत मताधिक्यासाठी रक्ताचे पाणी करेन.

यावेळी रामाप्पा करीगार,उदय जोशी, वसंतराव धुरे, विष्णुपंत केसरकर, सुधीर देसाई,अमर चव्हाण,जयसिंग चव्हाण, अभय देसाई,आभिजीत पाटील, बाबासाहेब पाटील,सोमगोंडा आरबोळे, गंगाधर व्हसकोटी, संतोष पाटील, जयकुमार मुन्नोळी, राकेश पाटील, प्रकाश पताडे, काशिनाथ तेली मारुती घोरपडे आदी उपस्थित होते.

Web Title: The formality of the election of 'Gokul' remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.