अर्जुनवाडमध्ये वीट उचलणी यंत्राची निर्मिती

By admin | Published: April 13, 2017 11:48 PM2017-04-13T23:48:58+5:302017-04-13T23:48:58+5:30

दहा लोकांचे काम एकावेळी : बाळू कुंभार, शिवाजी म्हैशाळे, अशोक पाटील यांचा उपक्रम

Formation of brick picking machine in Arjunwada | अर्जुनवाडमध्ये वीट उचलणी यंत्राची निर्मिती

अर्जुनवाडमध्ये वीट उचलणी यंत्राची निर्मिती

Next

राहुल मांगूरकर--अर्जुनवाड --वाळू उपसा, माती उपसा किवा ऊस तोडणीसाठी मशीन अशा सर्वच क्षेत्रांत यांत्रिकीकरण होत असताना याला विटभट्टी व्यवसायही मागे राहिला नाही. यासाठी विटभट्टीधारक बाळू महादेव कुंभार (रा. बेडग) यांनी वीट उचलणी यंत्राची कल्पकतेतून साकारणी केली आहे. यासाठी अर्जुनवाडच्या अशोक शंकर पाटील यांची मदत, तर शिवाजी बिरबल म्हैशाळे यांच्या सहकार्याने ते यशस्वी केले आहे. कुंभार यांची भेट घेतली असता ते म्हणाले, आमचा मोठा विटभट्टी व्यवसाय आहे. यासाठी मनुष्यबळाची मोठी गरज असते. तर गेली काही वर्षे विटभट्टीसाठी गाढव व हाकणारे मजूर मिळेनासे झाले आहेत. तर काहीवेळा अनेक अडचणी सांगून मजूर कामावर येण्याचे टाळतात. अनेकजण कामापोटी हात उसणे पैसे घेऊन पसार झाले आहेत. अशा घटना घडत असताना अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत. कुंभार पुढे म्हणाले, सहजपणे या व्यवसायात संकटांना सामोरे जाण्यासाठी काही करावेसे वाटत होते. यासाठी कच्ची वीट तयार करून ती भट्टीपर्यंत नेण्यासाठी होणारी ओढाताण, मजुरांचा नाकर्तेपणा, मनमानीपणा, विटांचे नुकसान या सर्व गोष्टींतून वीट उचलणी यंत्राची संकल्पना करून त्या यंत्राची निर्मिती केली. यामध्ये थर्माकॉलचे लहान पीस वीट म्हणून समजून कच्च्या मशीनचा आराखडा तयार केला. हे प्रत्यक्षात कोण मशीन तयार करेल, यासाठी इलेक्ट्रिशियनच्या शोधात असताना अर्जुनवाडचे शिवाजी म्हैशाळे यांच्या सहकार्याने तेथील अशोक पाटील यांना हे काम देऊन त्यांना याबाबत माहिती दिली.
साधारणत: २२ आॅगस्टपासून हे काम सुरू केले. तर ते नऊ महिन्यांनी पूर्ण झाले. यासाठी रिक्षाची चाके, जीपचा गिअर, कॉमेट इंजिन व लोखंडी सांगाडा वापरण्यात आला आहे. साधारणपणे यास दोन लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे. या यंत्राची प्रत्यक्ष पाहणी केली असता ते यशस्वी झाले आहे.
आजच्या पाहणीनुसार अंदाजे प्रती तास तीन हजारांपर्यंत वीट वाहून नेण्याची क्षमता या यंत्रामध्ये आहे. दहा माणसांचे काम एकावेळी होत असल्यामुळे वेळेची व पैशांची
बचत होत आहे. प्रथमच या यंत्राची निर्मिती कुंभार यांनी केल्यामुळे
यंत्रास ‘महासोनाई’ असे नाव दिले आहे.

Web Title: Formation of brick picking machine in Arjunwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.