माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांची ऐतिहासिक पन्हाळा पाहण्यासाठी सदिच्छा भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2022 07:20 PM2022-07-31T19:20:15+5:302022-07-31T19:22:02+5:30
पन्हाळ्याच्या इतिहासकालीन माहितीने झाले प्रभावित
Manoj Naravane visit to historic Panhala पन्हाळा: पन्हाळ्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी भेट दिली. त्यांना माहिती देण्याचे काम इतिहास आभ्यासक डॉ. अमर अडके यांनी केले. स्वच्छ पन्हाळा व ऐतिहासिक इमारती पाहून नरवणे यांनी आनंद व्यक्त केला. नव्या आणि जुन्याचा येथे चांगला संगम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच, अभ्यासक अमर अडके यांनी दिलेल्या पन्हाळ्याच्या इतिहासकालीन माहितीने ते प्रभावित झाले.
माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे पन्हाळ्यातील साठमारी पाहून बाहेर पडताना सोबत इतिहास अभ्यासक डॉ. अमर अडके
माजी लष्कर प्रमुख पन्हाळ्याला येणार म्हणुन वाघबिळ पासुन सर्व वाहतुक बंद ठेवली होती. तर पन्हाळ्यावरील सर्व पर्यटकांना दुपारीच बाहेर काढले होते. झुणका-भाकर केंद्रे व सर्व व्यवसाय बंद ठेवले होते. दरम्यान माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी सज्जाकोठी, साठमारी, संभाजी मंदिर, तीन दरवजा, आंधारबाव इत्यादी ठिकाणे पाहिली आणि सायंकाळी सहा वाजता ते न्यू पॅलेस कोल्हापूरकडे रवाना झाले.