विद्यापीठाचे माजी बीसीयुडी संचालक अर्जुन राजगे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:26 AM2021-08-23T04:26:46+5:302021-08-23T04:26:46+5:30
गेल्या महिन्यापासून प्राचार्य डॉ. राजगे यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात कोरोनावरील उपचार सुरू होते. त्यांनी रविवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास ...
गेल्या महिन्यापासून प्राचार्य डॉ. राजगे यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात कोरोनावरील उपचार सुरू होते. त्यांनी रविवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. शेवरी (जि. सातारा) हे त्यांचे मूळ गाव, पण सध्या ते कोल्हापुरातील आपटेनगरमध्ये राहत होते. शैक्षणिक क्षेत्रातील प्रारंभी त्यांनी भोर कॉलेज आणि इचलकरंजीतील व्यंकटेश महाविद्यालयात प्राध्यापकपदी काम केले. न्यू कॉलेजमध्येही त्यांनी काम केले. राजर्षी शाहू आर्टस् अँड कॉमर्स कॉलेजमध्ये ते सन १९९७ मध्ये प्राचार्यपदी रुजू झाले. त्यांनी सन २००५ ते २०१० दरम्यान विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यपदी, तर सन २०१० ते २०१५ या कालावधीत बीसीयुडी संचालकपदी काम केले. विद्यार्थीकेंद्री अग्रणी महाविद्यालय योजना अंमलात आणण्यासाठी त्यांनी योगदान दिले. विद्यापीठ प्राचार्य असोसिएशनचे कोल्हापूर जिल्हा सचिव आणि ‘व्यावसायिक अर्थशास्त्र व अर्थशास्त्र’ अभ्यासमंडळाच्या सदस्यपदी त्यांनी काम पाहिले.
चौकट
जाणकार शैक्षणिक प्रशासक हरपला
प्राचार्य डॉ. ए. बी. राजगे यांच्या निधनामुळे शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील एक महत्त्वाचा, जाणकार शैक्षणिक प्रशासक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी शोकभावना कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केली.
फोटो (२२०८२०२१-कोल-अर्जुन राजगे (निधन)
220821\22kol_4_22082021_5.jpg
फोटो (२२०८२०२१-कोल-अर्जुन राजगे (निधन)