Kolhapur: इचलकरंजी भाजपात बंडखोरी, हिंदुराव शेळके विधानसभेच्या रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 04:01 PM2024-10-19T16:01:28+5:302024-10-19T16:01:57+5:30

आवाडे विरोधकांची मोट बांधणार

Former BJP district president Hindurao Shelke will contest assembly elections from Ichalkaranji constituency | Kolhapur: इचलकरंजी भाजपात बंडखोरी, हिंदुराव शेळके विधानसभेच्या रिंगणात

Kolhapur: इचलकरंजी भाजपात बंडखोरी, हिंदुराव शेळके विधानसभेच्या रिंगणात

इचलकरंजी : भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी विधानसभा निवडणुकीत उभारणार असल्याची घोषणा पत्रकार परिषद घेऊन केली. त्यामुळे इचलकरंजीभाजपात बंडखोरी झाली असून, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरताना दिसत आहे.

शेळके म्हणाले, २००४ साली मला भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली होती. त्यावेळी प्रकाश आवाडे यांनी सत्तेच्या बळावर उमेदवारी अर्ज छाननीमध्ये उडविला. त्यापूर्वी जवळपास ४० वर्षांपासून आम्ही आवाडे विरोधक आहोत. असे असताना पक्षाने निष्ठावंतांना डावलून ज्यांच्याशी संघर्ष केला, त्या आवाडे घराण्यात उमेदवारी देण्याचे ठरवले. ही भूमिका कार्यकर्त्यांना रूचली नाही.

इचलकरंजीसह जिल्ह्यात पक्ष मजबूत करण्याचे काम करणारे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर हे सक्षम उमेदवार असताना तसेच पक्षातील माझ्यासह अन्य इच्छुक उमेदवार असताना पक्षाने सर्वांना डावलले. त्याचबरोबर आवाडे यांच्या घराणेशाहीला जनता कंटाळली असून सक्षम पर्याय शोधत आहे. त्यासाठी आपण मतदारांच्या पाठबळावर आखाड्यात उतरत आहोत.

आवाडे विरोधकांची मोट बांधणार

मी यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी करून भाजपामध्ये आलो आहे. त्यामुळे सगळ्या पक्षांमध्ये माझे मित्र आहेत. तसेच इचलकरंजीतील ३२ विभागांतील भाजपचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. या सर्वांची आवाडेविरोधी एकत्रित मोट करणार आहे.

सर्व पर्याय खुले

भाजपाने निष्ठावंतांना डावलल्याने कार्यकर्त्यांचा सन्मान जपण्यासाठी आणि शहराच्या विकासासाठी आपण निवडणुकीस सामोरे जात असून काँग्रेस, राष्ट्रवादीसह कोणत्याही पक्षाकडून उमेदवारीसाठी विचारणा झाल्यास आपण सर्व पर्याय खुले ठेवले आहेत.

मी पदाला न्याय दिला

जिल्हाध्यक्ष असताना चंदगडपासून शिरोळपर्यंत, तसेच कागलपासून हातकणंगलेपर्यंत गावोगावी जाऊन शाखा स्थापन केली. जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सदस्य निवडून आणले.

Web Title: Former BJP district president Hindurao Shelke will contest assembly elections from Ichalkaranji constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.