जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 11:12 AM2022-02-14T11:12:14+5:302022-02-14T11:13:16+5:30
यड्राव : येथील जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर (वय -७३ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. यड्राव येथे ...
यड्राव : येथील जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर (वय -७३ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. यड्राव येथे त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. निंबाळकर (सरकार) हे मामा या नावाने सर्व परिचित होते.
नाईक-निंबाळकर यांनी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार व शामराव पाटील यड्रावकर यांच्यासमवेत राजकीय कार्यास सुरुवात केली. त्यांनी एकोणीस वर्षे यड्रावचे सरपंचपद भूषविले होते. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपदी होते. ते कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी चे उपाध्यक्ष होते. त्यांनी विविध संस्था व सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून लोकसंग्रह केला होता.
विविध राजकिय पक्षातील नेते मंडळीशी त्यांचे आपुलकीचे संबंध होते. त्यांचा गावचे सरपंच पद ते जिल्हा बँकेचे अध्यक्षपद हा राजकीय प्रवास त्यांच्या सार्वजनिक कार्याचा लौकिक आहे. त्यांच्या पश्चात चार मुली एक मुलगा असा परिवार आहे. जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका उदयांनी साळुंखे यांचे ते वडील होत.