कर्नाटकच्या माजी उपमुख्यमंत्र्यांच्या कारचा अपघात, चालकाचा ताबा सुटल्याने कालव्यात कार उलटली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 05:10 PM2022-08-31T17:10:02+5:302022-08-31T18:16:52+5:30

सुदैवाने सवदी यांच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली.

Former Deputy Chief Minister of Karnataka Laxman Savadi car accident | कर्नाटकच्या माजी उपमुख्यमंत्र्यांच्या कारचा अपघात, चालकाचा ताबा सुटल्याने कालव्यात कार उलटली

कर्नाटकच्या माजी उपमुख्यमंत्र्यांच्या कारचा अपघात, चालकाचा ताबा सुटल्याने कालव्यात कार उलटली

googlenewsNext

चिकोडी : कर्नाटक राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या कारचा अपघात झाला. कारच्या आडव्या आलेल्या एका दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटून कार कालव्यात उलटली. सुदैवाने सवदी यांच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली. अथणीहुन बेळगांवकडे निघाले असता हा अपघात घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी हे घरी गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करून अथणीहुन बेळगांवकडे जत-जांबोटी राज्यमार्ग 31 या मार्गावरून निघाले होते. हिडकल - हारुगेरी दरम्यान त्यांच्या कारच्या आडवी आलेल्या एका दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने गाडी नजीकच्या घटप्रभा उजव्या कालव्यात उलटली.   

अपघातानंतर कारमधील एअरबॅग ओपन झाल्याने चालक सनरुफमधून बाहेर आला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी कारमध्ये अडकलेल्या सवदी यांना बाहेर काढले. त्यांच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत व श्वास घेताना त्रास होत असल्याने हारुगेरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना बेळगावकडे नेले असून त्यांची प्रकृती ठिक असल्याची माहिती मिळाली. अपघाताची माहिती मिळताच हारुगेरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

Web Title: Former Deputy Chief Minister of Karnataka Laxman Savadi car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.