दारू साठाप्रकरणी माजी उपनगराध्यक्षाला मुलासह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:25 AM2021-04-24T04:25:38+5:302021-04-24T04:25:38+5:30

माजी उपनगराध्यक्ष शहिद गुलाब कलावंत ( वय ६१ ), अमीर शहीद कलावंत ( ४०, दोघे रा.टाकवडे वेस) व किशोर ...

Former deputy mayor arrested along with his son in liquor case | दारू साठाप्रकरणी माजी उपनगराध्यक्षाला मुलासह अटक

दारू साठाप्रकरणी माजी उपनगराध्यक्षाला मुलासह अटक

Next

माजी उपनगराध्यक्ष शहिद गुलाब कलावंत ( वय ६१ ), अमीर शहीद कलावंत ( ४०, दोघे रा.टाकवडे वेस) व किशोर बाळासाहेब पाटील (३९ रा. गावभाग), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गावभागातील कलावंत यांच्या घरातून देशी-विदेशी मद्याची चोरून विक्री सुरू असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कलावंत व त्याचा मुलगा अमीर व खरेदीसाठी आलेला किशोर यांना अटक केली.

चौकट

बेकायदेशीर दारू वाहतूक दोघांना अटक

येथील नदीवेस नाका परिसरात मोटारसायकलवरून जाणाऱ्या दोघांना संशयावरून पोलिसांनी पकडले. त्यांची तपासणी केली असता साडेतीन हजार रुपये किमतीच्या विविध कंपनीच्या मद्याच्या बाटल्या आढळल्या. त्यामुळे पोलिसांनी जलाल कादर तगाला ( वय ३२ ) व आकाश शिवाजी आवळे ( वय ५२, दोघे रा. लालनगर ) या दोघांना अटक केली.

त्यांच्याकडून बाटल्या, मोटारसायकल, असा एकूण 23 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: Former deputy mayor arrested along with his son in liquor case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.